Shreya Maskar
जेवल्यानंतर गोड खाण्याची इच्छा होत असेल तर झटपट दुधी हलवा बनवा.
दुधी हलवा बनवण्यासाठी दुधी भोपळा, ड्रायफ्रूट्स, मावा, वेलची पावडर, केशर, दूध, तूप आणि साखर इत्यादी साहित्य लागते.
दुधी हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तूप टाकून किसलेला दुधी परतून घ्या.
यात थोडे दूध, साखर घालून छान विरघळून घ्या.
त्यानंतर तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाका.
दुधी हलवा चांगला परतल्यावर त्यात मावा, केशर टाका.
शेवटी गॅस बंद करून यात वेलची पावडर टाका.
वरून ड्रायफ्रूट्सचे छोटे काप टाकून दुधी हलव्याचा आस्वाद घ्या.