Shreya Maskar
टोमॅटो शेव भाजी बनवण्यासाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग, कांदा, आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, टोमॅटो, हळद, लाल तिखट, गरम मसाला, जिरेपूड, पाणी, मीठ, शेव आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
टोमॅटो शेव भाजी बनवण्यासाठी पॅनमध्य तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि हिंग टाका.
आता त्यात कांदा, आले-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घाला.
कांदा गोल्डन फ्राय झाल्यावर टोमॅटो, हळद, लाल तिखट, गरम मसाला, जिरेपूड आणि मीठ घालून मिक्स करा.
टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगला शिजवून घ्या.
शेवटी वाटीभर शेव आणि कोथिंबीर घालून भाजी मिक्स करा.
भाजीची चव वाढवण्यासाठी तुम्ही यात दही किंवा क्रीम देखील घालू शकता.
गरमागरम टोमॅटो शेव भाजीचा चपातीसोबत आस्वाद घ्या.