Shreya Maskar
उपवासाला संध्याकाळच्या नाश्त्याला चटपटीत फराळी मिसळ बनवा.
उपवासाची मिसळ बनवण्यासाठी साबुदाणा खिचडी, दही, मिरची, जिरं, मीठ, बटाट्याचा शेव, वेफर्स, तळलेले शेंगदाणे, काकडी, शेंगदाण्याची आमटी, साखर, लिंबू आणि डाळिंबाचे दाणे इत्यादी साहित्य लागते.
एका बाऊलमध्ये साबुदाणा खिचडी आणि बटाट्याचे तुकडे चांगले मिक्स करा.
यात तुम्ही आवडीनुसार वरईचा भातही टाकू शकता.
त्यावर साबुदाणा चिवडा, बटाट्याचा शेव, वेफर्स आणि दही घालून मिक्स करा.
वरून मिरचीचा ठेचा, चिरलेली काकडी, तळलेले शेंगदाणे टाका.
आवडीनुसार लिंबू पिळा आणि डाळिंबाचे दाणेही घाला.
यासोबत शेवटी शेंगदाणा आमटीचा आस्वाद घ्या.