Shreya Maskar
मक्याचा डोसा बनवण्यासाठी मक्याचे पीठ, गव्हाचे पीठ, कांदा, हिरव्या मिरच्या, जिरे, आले-लसूण पेस्ट, हळद, मीठ आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
मक्याचा डोसा बनवण्यासाठी बाऊलमध्ये मक्याचे पीठ, गव्हाचे पीठ, मीठ, जिरे, हळद, आले-लसूण पेस्ट टाका.
आता यात थोडे पाणी आणि कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्या
पॅनमध्ये तेल टाकून त्यात डोशाचे मिश्रण गोलाकार पसरवून घ्या.
मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी डोसा गोल्डन फ्राय करा.
सांबार आणि चटणीसोबत तुम्ही डोसाचा आस्वाद घेऊ शकता.
तुम्ही यात आवडीनुसार भाज्या आणि मसाले घाला.
तुम्ही डोशाची चव वाढवण्यासाठी यात पनीर आणि चीज टाकू शकता.