Surabhi Jayashree Jagdish
हार्ट अटॅक आल्यानंतर अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागतो.
आठवड्याच्या एका विशिष्ट दिवशी लोकांना हृदयविकाराचा झटका जास्त येतात. तो दिवस सोमवार नसून दुसरा काही नाही.
अनेक संशोधनांमध्ये असं आढळून आलंय की, बहुतेक हृदयविकाराचे झटके सोमवारी येतात.
बॉलिवूड अभिनेत्री माधुरीचे डॉक्टर पती श्रीराम नेने यांच्या मते, सोमवारी हृदयविकाराचं एक कारण आपल्या शरीराच्या सर्केडियन रिदमशी संबंधित असू शकते.
सर्केडियन रिदम आपल्या झोपेच्या आणि जागे होण्याच्या चक्राशी संबंधित आहे.
कारण आठवड्याच्या शेवटी विश्रांती घेतल्यानंतर, सोमवारी बहुतेक लोकांच्या झोपेचा वेळ बिघडतो.
परिणामी ताण-तणावात वाढ होते आणि हे वाढल्याने हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो.