Heart Attack Symptoms  google
लाईफस्टाईल

Heart Attack: झोपेतून उठताच थकवा जाणवतो? असू शकतं हार्ट अटॅकचं लक्षण, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Heart Attack Symptoms: सकाळी उठताच थकवा, छातीत दाब किंवा धाप लागणे ही हार्ट अटॅकची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. वेळीच ओळख करून डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

Sakshi Sunil Jadhav

सगळ्यांना हिवाळा हा ऋतू आवडतो. सकाळी पडणाऱ्या थंडीत कोणालाच उठावसं वाटत नाही. असं वाटतं आणखी काहीवेळ चादर अंगावर घेऊन झोपावं. पण याचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम आपण सहज दुर्लक्षित करत असतो. कारण थंडीत शरीराची हालचाल खूप कमी प्रमाणात होते, काही काम करावसं वाटत नाही. अशाच काहीं सवयींमुळे तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो, असं तज्ज्ञ सांगतात.

हार्ट अटॅक हा जीवघेणा आजार आहे. ह्रदयापर्यंत रक्त पोहचलं नाही की हा झटका येतो. त्यानंतर शरीरातला प्रत्येक अवयव हळूहळू काम करणं थांबतं. हार्ट अटॅक हा कधीही केव्हा ही येतो. ज्याचा कालवधी अगदी काही क्षणांचा सुद्धा असू शकतो. याची आणखी कारणं सुद्धा असू शकतात. पण सगळ्यात मोठं कारण म्हणजे ह्रदयापर्यंत रक्त पोहोचण्यास अडथळे निर्माण होणे. असं WHO संघटनेने स्पष्ट केले आहे.

तज्ज्ञांच्या मते तुम्हाला जर सकाळच्या वेळेस काही लक्षणं जाणवली तर ही हार्ट अटॅकची लक्षणे समजावी आणि तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ही लक्षणे ओळखणं खूप सोपं आहे. जसे की, सकाळी उठल्यानंतर छातीत अचानक बदल जाणवणं. ही समस्या सकाळी सहा ते दुपारी बारा या वेळेत जास्त जाणवते.

छातीत दाब निर्माण झाल्यासारखं वाटणं, श्वास घेताना त्रास होणे, छातीत जळजळ किंवा जखडल्यासारखं वाटणे अशा समस्या जाणवतात. ज्या काही मिनिटं त्रास देतात किंवा अधूनमधून जाणवतात. याने सकाळी अचानक ब्लड प्रेशर वाढतो.

सकाळी उठल्यावर काही पावलं चालताना अचानक दम लागतो किंवा श्वास घेण्यास त्रास होतो हे सुद्धा धोक्याचे संकेत असतात. कोणतंही जड काम न करता फक्त उठताना किंवा बेडवरून खाली उतरताना धाप लागणं म्हणजे हार्ट व्यवस्थित रक्त पंप करू शकत नाही, याचा इशारा असू शकतो. ही समस्या महिलांमध्ये जास्त दिसते आणि त्यासोबत थकवाही जाणवतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Skin Face Pack: ड्राय स्किनसाठी पार्लरमध्ये जाण्यापेक्षा, घरच्या घरीच ट्राय करा 'हा' फेस पॅक, मिळेल सॉफ्ट स्किन

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार

Designer Sarees: न्यू ईअर पार्टीला सगळ्यात हटके दिसायचंय? मग या ४ लेटेस्ट डिझाइनर साड्या आत्ताच करा खरेदी

Pune : ना जागावाटप, ना उमेदवार; नुसत्याच चर्चा, जोरबैठका; पुण्यात कन्फ्युजनही कन्फ्युजन, सोल्यूशनचा पत्ताच नाही!

गुप्त ठिकाणी बैठक, हातात बंद लिफाफे मनसे आणि ठाकरे गटात नेमकं काय घडतंय? VIDEO

SCROLL FOR NEXT