आता WhatsApp Chat नको असलेले डिलिट करा, हवे असलेले ठेवता येणार, नवं फीचर आलं, कटकट संपली!

WhatsApp New Feature: WhatsApp ने नवीन अॅडव्हान्स्ड चॅट मॅनेजमेंट फीचर आणले आहे. यामुळे फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट वेगवेगळे डिलीट करता येणार असून महत्वाचे चॅट सुरक्षित ठेवता येतील.
WhatsApp introduces a new feature allowing users to delete selected chats
WhatsApp New Advanced Chat Management Featuregoogle
Published On

कोणतंही महत्वाचं काम असलं की WhatsApp वर त्यागोष्टी पाठवल्या जातात. कामाच्या महत्वाच्या PDF पासून ते घरातल्या वाण सामानाची यादी सुद्धा मोबाईलमध्ये पाहायला मिळते. या सगळ्यांच्या नोंदी आपण चॅट्समध्ये ठेवतो. काही गोष्टी पीन करून ठेवतो. पण काही वेळेस नको असेलेले चॅट्स आपल्याला क्लिअर करायचे असतात. तेव्हा आपण थेट क्लिअर चॅट हाच पर्याय निवडतो. आता यामध्ये WhatsAppने नवीन आणि खूप महत्वाच्या सेटींग्समध्ये बदल केले आहेत.

WhatsAppच्या नव्या अॅडव्हान्स्ड चॅट मॅनेजमेंट टूल लॉंच केलेले आहेत. याच्या मदतीने युजर्स फोटो, व्हि़डीओ, डॉक्यूमेंट, वॉइस मेसेज, स्टार केलेले स्टिकर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींना सिलेक्ट करून थेट डिलीट करू शकता. यातली एक खासियत म्हणजे आता कोणतेही चॅट डिलीट करताना फक्त १ कन्फॉर्मेशन नाही तर १ सोपी बॉटम शीट दिसेल. त्यामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी डिलीट केल्यात त्या दिसणार आहेत.

WhatsApp introduces a new feature allowing users to delete selected chats
Digestion Problems: थंडीत जेवण पचायला वेळ लागतोय? 'हे' घरगुती उपाय पोटाच्या सगळ्या समस्या करतील दूर

WhatsAppने युजर्ससाठी ही खूप मोठी भेट दिली आहे. यामुळे कोणतेही मेसेज केव्हाही डिलीट करता येणार आहेत. म्हणजे पुर्वी चॅट्स डिलीट करताना कोणत्याच गोष्टी सेव्ह करता किंवा ठेवता येत नव्हत्या.

पण आता तुम्हाला त्या सेव्ह करता येणार आहेत. तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या चॅट्समधल्या काही गोष्टी हव्यात तर क्लिअर चॅट करताना तुम्हाला एक ऑप्शन येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला हवे असेलेले चॅट्स तुम्ही ठेवू शकता. याने तुम्हाला हवे असलेले चॅट्स तुम्हाला वेळेवर सापडू शकतात. सध्या गुगलमध्ये महत्वाचा असणारे WhatsApp Call सुद्धा रेकॉर्ड करता येऊ शकतो.

WhatsApp introduces a new feature allowing users to delete selected chats
Sugar Cookies Recipe: ख्रिसमससाठी खास, घरच्या घरी बनवा शुगर कुकीज, वाचा सोपी रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com