Sakshi Sunil Jadhav
ख्रिसमस सणात केक, कुकीज आणि गोड पदार्थांना खास महत्त्व असते. बाजारातील कुकीजपेक्षा घरच्या घरी बनवलेल्या शुगर कुकीज चवीला खास आणि हेल्दी असतात.
शुगर कुकीज या बटर, साखर आणि मैदा वापरून बनवल्या जाणाऱ्या हलक्या, खुसखुशीत कुकीज असतात. ख्रिसमसला या कुकीज खास करून बनवल्या जातात.
मैदा, बटर, साखर पावडर, अंडी, व्हॅनिला एसन्स, बेकिंग पावडर आणि चिमूटभर मीठ इ.
मऊ बटर आणि साखर एकत्र करून हलकं आणि फुलकं होईपर्यंत नीट फेटा. यामुळे कुकीज नरम सॉफ्ट होतात.
मैदा थोडा-थोडा घालत मऊ पीठ मळा. पीठ फार घट्ट किंवा फार सैल करू नका.
ख्रिसमस थीमप्रमाणे स्टार, ट्री, स्नोमॅन अशा साच्यांचा वापर करून कुकीज कापा.
ओव्हन 180°C वर प्रीहिट करा आणि कुकीज 10 ते 12 मिनिटे बेक करा. रंग हलका सोनेरी झाला की कुकीज तयार करा.
कुकीज थंड झाल्यावर आयसिंग शुगर, चॉकलेट किंवा रंगीत स्प्रिंकल्सने सजवा.