आता WhatsApp Call सुद्धा रेकॉर्ड होतील, फॉलो करा या 4 स्टेप्स

WhatsApp Call Recording: WhatsApp कॉल थेट रेकॉर्ड करण्याचा पर्याय नसला तरी Android युजर्स स्क्रीन रेकॉर्डिंगद्वारे कॉल सेव्ह करू शकतात. iPhone युजर्ससाठी मात्र मर्यादा आहेत.
WhatsApp Call Recording
WhatsApp call recordinggoogle
Published On

WhatsApp हा प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. हे कॉल्स एंड-टू-एंड एन्क्रिप्शनवर आधारित असल्यामुळे ते पूर्णपणे सुरक्षित आहे. याच सुरक्षेच्या कारणामुळे WhatsApp अ‍ॅपमध्ये थेट कॉल रेकॉर्डिंगचा कोणताही पर्याय देण्यात आला नाही.

Meta कंपनीच्या मते, इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग फीचर दिल्यास युजर्सच्या प्रायव्हसीवर परिणाम होऊ शकतो. मात्र, बऱ्याचदा वैयक्तिक किंवा कामाच्या कारणांसाठी कॉल सेव्ह करणं गरजेचं असतं. अशा वेळी स्क्रीन रेकॉर्डिंग हा एक सोपा पर्याय ठरतो.

Android वापरकर्त्यांसाठी WhatsApp कॉल रेकॉर्ड करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे फोनमधील स्क्रीन रेकॉर्डिंग फीचर. स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू केल्यावर फोनची स्क्रीन आणि ऑडिओ दोन्ही रेकॉर्ड होतात, त्यामुळे WhatsApp कॉल आपोआप सेव्ह होते. या पद्धतीसाठी कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपची गरज लागत नाही, त्यामुळे प्रायव्हसीही सुरक्षित राहते.

WhatsApp Call Recording
Early Signs of Infection: संसर्गाची सुरुवात कशी ओळखता येते? ही ५ लक्षणं दुर्लक्षित करणं पडेल महागात

रेकॉर्डिंगची कॉलीटी फोनच्या मायक्रोफोन आणि स्पीकरवर अवलंबून असते. बहुतेक Android स्मार्टफोन्समध्ये स्क्रीन रेकॉर्डिंगचा पर्याय क्विक सेटिंग पॅनलमध्ये दिलेला असतो.

स्क्रीनच्या वरून पॅनल ओपन करून Screen Record किंवा Screen Capture हा पर्याय सुरू करता येतो. Samsung, Xiaomi, Vivo, OnePlus यांसारख्या वेगवेगळ्या ब्रँडमध्ये या फीचरचे नाव थोडे वेगळे असू शकते. कॉल दरम्यान स्पीकर ऑन ठेवल्यास आवाज क्लिअर रेकॉर्ड होतो आणि ही पद्धत WhatsApp कॉल रेकॉर्डिंगसाठी जास्त विश्वासाची वाटते.

मात्र iPhone युजर्ससाठी ही प्रक्रिया इतकी सोपी नाही. Apple ची कडक सिक्युरिटी पॉलिसी आणि iOS च्या मर्यादांमुळे स्क्रीन रेकॉर्डिंग WhatsApp कॉलचा आवाज कॅप्चर करत नाही. स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू झाले तरी कॉलचा ऑडिओ रेकॉर्ड होत नाही.

WhatsApp Call Recording
LIC पॉलिसीधारकांसाठी इशारा! या छोट्या चुकीमुळे होऊ शकतो मोठा तोटा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com