Shruti Vilas Kadam
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनला जोरदार सुरुवात झाली असून, कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांसोबत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिवसाच्या सुरुवातीला आयोजित करण्यात आलेल्या पूल पार्टीत सर्वांनी मनसोक्त आनंद लुटला. हसत-खेळत साजरा झालेला हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला.
पूलसाइड व्हॉलीबॉल मॅचमध्ये विजय आणि त्यांचे मित्र सहभागी झाले. या मॅचचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच ते व्हायरल झाले.
रात्रीच्या कार्यक्रमात रोमँटिक कँडललाइट डिनर आयोजित करण्यात आले होते. गुलाबी लिली आणि हिरव्या हायड्रेंजियाच्या फुलांनी सजवलेली टेबल विशेष लक्ष वेधून घेत होती.
पाहुण्यांसाठी खास जपानी शैलीतील जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. स्पेशल मेनू कार्ड्समुळे या डिनरला वेगळीच शोभा आली.
डिनर सेटिंगमध्ये हिरव्या नैपकिनवर ‘विरोश’ हे नाव दिसून आले. विजय आणि रश्मिका यांच्या नावांवरून चाहत्यांनी दिलेलं हे नाव त्यांच्या प्रेमाचं प्रतीक आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या निमंत्रणानुसार, दोघांचं लग्न 26 फेब्रुवारी 2026 रोजी उदयपूर येथे होणार आहे. या शाही लग्नासाठी चाहते आतुरतेने पुढील अपडेट्सची वाट पाहत आहेत.