Shruti Vilas Kadam
रंग लावण्याआधी कोरफड नारळ तेल, बदाम तेल किंवा जाड मॉइश्चरायझर त्वचेवर लावा. यामुळे रंग थेट त्वचेत मुरत नाही आणि नंतर सहज निघून जातो.
रंग पंचमीला उन्हात जास्त वेळ राहावे लागते. त्यामुळे SPF असलेले सनस्क्रीन लावल्यास त्वचा टॅनिंग आणि सनबर्नपासून सुरक्षित राहते.
डोळ्यांभोवती, ओठ, मान आणि कानाच्या मागील भागावर जाड क्रीम लावा. या भागांवर रंग लवकर चिकटतो आणि काढताना त्रास होतो.
रंगांमुळे ओठ कोरडे पडू शकतात. त्यामुळे रंग खेळण्याआधी लिप बाम किंवा तूप लावल्यास ओठ सुरक्षित राहतात.
नखांवर पारदर्शक नेल पॉलिश लावा. यामुळे नखांमध्ये रंग साचत नाही आणि नंतर स्वच्छ करणे सोपे जाते.
जड मेकअप टाळा. फक्त मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि लिप बाम एवढेच पुरेसे आहे. यामुळे त्वचा मोकळी राहते.
रंग पंचमीला शक्यतो हर्बल किंवा नैसर्गिक रंग वापरा. हे रंग त्वचेला कमी नुकसान करतात आणि अॅलर्जीचा धोका कमी असतो.