Shruti Vilas Kadam
साध्या रंगाचा ब्लाउज आणि नेकलाइन किंवा स्लीव्ह्जमध्ये वेगळा कट दिल्यास ब्लाउज डिझायनर दिसतो. कॉटन आणि सिल्क साडीसोबत हा प्रकार छान शोभतो.
बोट नेक असलेले साधे ब्लाउज क्लासिक आणि ग्रेसफुल लूक देतात. ऑफिस वेअर आणि फॉर्मल कार्यक्रमांसाठी हा डिझाईन योग्य आहे.
ब्लाउजच्या मागील बाजूला छोटा कट, बटणांची रांग किंवा दोरी दिल्यास साध्या ब्लाउजलाही डिझायनर टच मिळतो.
साध्या साडीसोबत हलक्या कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाउज घातल्यास साडीचा लूक अधिक उठून दिसतो. हा प्रकार रोजच्या वापरासाठीही योग्य आहे.
फक्त नेकलाइन किंवा स्लीव्ह्जवर हलकी एम्ब्रॉयडरी असलेले ब्लाउज सण-उत्सवांसाठी परफेक्ट असतात. हे ब्लाउज ओव्हरड्रेस न वाटता एलिगंट लूक देतात.
साधे डिझायनर ब्लाउज एकापेक्षा जास्त साड्यांवर वापरता येतात. त्यामुळे वेळ, पैसा आणि फॅशन तिन्हीची बचत होते.