Heart Attack Signs google
लाईफस्टाईल

Heart Attack Signs: हार्ट अटॅक येण्याआधी महिनाभर आधीच समजते, या लक्षणाकडे दुर्लक्ष करणं महागात पडेल

Heart Care: हार्ट अटॅक येण्याआधी शरीर अनेक संकेत देतं. झोपल्यावर श्वास घेण्यास त्रास होणं हे हृदयविकाराचं गंभीर लक्षण असू शकतं, असा डॉक्टरांचा इशारा आहे.

Sakshi Sunil Jadhav

हार्ट अटॅक येण्याआधी झोपल्यावर श्वास घेण्यास त्रास होतो.

तज्ज्ञांच्या मते, ९२% रुग्णांना हे लक्षण आधीच जाणवतं.

हा त्रास आम्लपित्त किंवा ताण नसून हृदय कमजोर झाल्याचा संकेत असू शकतो.

उपचार केल्यास हार्ट फेल्युअर किंवा अटॅक टाळता येऊ शकतो.

जेव्हा आपण हार्ट अटॅकबद्दल विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर अचानक छातीत वेदना, दाब जाणवणं किंवा श्वास घेताना छातीत त्रास होणं ही सामान्य लक्षणं डोळ्यासमोर उभी राहतात. पण खरा इशारा जर काही दिवस आधीच शरीर देत असेल, आणि आपण तो दुर्लक्ष करत असू तर? यासंबंधीत पुढे आपण सविस्तर जाणून घेऊ.

ऑर्थोपेडिक आणि स्पोर्ट्स सर्जन डॉ. ओबैदूर रहमान यांनी अलीकडेच इंस्टाग्रामवर एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. त्यानुसार, हार्ट अटॅक येण्याआधी जवळपास प्रत्येक रुग्णाला एक सामान्य पण दुर्लक्षित लक्षण जाणवतं. त्यातील तब्बल ९२ टक्के लोक ते दुर्लक्ष करतात. हे लक्षण ना वेदना असतं, ना दडपण तर ते असतं झोपल्यावर श्वास घेण्यास त्रास होणं. ज्याला वैद्यकीय भाषेत Orthopnea म्हणतात.

अनेकांना हा त्रास आम्लपित्त, ताणतणाव किंवा टेंशनमुळे होतो असं वाटतं, पण खरंतर हा शरीराचा गंभीर इशारा असतो. हृदय कमजोर झालं की रक्त फुफ्फुसांकडे साचतं, आणि जेव्हा आपण आडवं झोपतो तेव्हा गुरुत्वाकर्षणाची मदत कमी मिळते. त्यामुळे श्वास घेणं अवघड होतं.

ऑर्थोप्निया हा फक्त त्रास नाही, तर हृदयविकाराचा थेट इशारा आहे. आडवं झोपल्यावर शरीराच्या खालच्या भागातून जास्त रक्त हृदयाकडे परत येतं. निरोगी हृदय हे सहज पंप करतं, पण कमजोर किंवा कठीण झालेलं हृदय जसं हार्ट फेल्युअर किंवा कोरोनरी आर्टरी डिसीजमध्ये होतं. त्या रक्ताचा ताण सहन करू शकत नाही. परिणामी, फुफ्फुसांमध्ये द्रव साचतो आणि श्वास घेणं कठीण होतं.

जर तुम्हीही झोपताना वारंवार उशी वाढवत असाल, आडवं होताच श्वास गुदमरल्यासारखं होत असेल, किंवा रात्री अचानक श्वास रोखल्यासारखं वाटून जाग येत असेल तर हे तणाव नाही तर हे शरीराचं SOS सिग्नल आहे. तुमचं हृदय स्वतःच्या द्रवात बुडतंय, अशी ती अवस्था असते.

हार्ट अटॅक येण्याआधी कोणती लक्षणं दिसतात?

झोपल्यावर श्वास घेण्यास त्रास, छातीत दाब जाणवणं, थकवा, आणि रात्री गुदमरल्यासारखं वाटणं ही महत्त्वाची लक्षणं आहेत.

झोपल्यावर श्वास घेण्यास त्रास होतो म्हणजे काय?

याला वैद्यकीय भाषेत orthopnea म्हणतात. हे हृदय कमजोर झाल्याचं संकेत असू शकतं.

हे लक्षण दिसल्यास काय करावं?

तज्ञांचा सल्ला घ्यावा, ईसीजी, इको किंवा इतर तपासण्या करून घ्याव्यात.

हे लक्षण टाळण्यासाठी काय उपाय करता येतील?

ताण कमी ठेवा, नियमित व्यायाम करा, मीठ आणि तळलेले पदार्थ टाळा, तसेच नियमित हृदय तपासणी करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या की हत्या? लग्नाच्या 10 महिन्यात नेमकं काय घडलं?

Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; कारच्या पुढील भागाचा चुरा, २ जणांचा जागीच मृत्यू

Local Body Election : स्थानिक निवडणुकीत आता 'साडी पॅटर्न'; अवघ्या महिलांची 40 रुपयावर मतदारांची बोळवण, VIDEO

Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या लग्नात विघ्न; वडिलांच्या पाठोपाठ होणाऱ्या नवऱ्याची प्रकृती बिघडली

BMC Election : महापालिकेची ही शेवटची निवडणूक, हातातून मुंबई गेली तर...; राज ठाकरे स्पष्टच बोलले, VIDEO

SCROLL FOR NEXT