Avocado Fruit  Saam TV
लाईफस्टाईल

Avocado Fruit : अवोकाडो खा आणि नरोगी राहा; डायबिटीजसह 'या'आजारांवर गुणकारी

Benefits Of Avocado Fruit : अवोकाडो या फळामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शिअम आणि जिवनस्त्व असतात. याचे सेवन केल्याने तु्मच्या आरोग्याशी संबंधित विविध समस्या दूर होतील. त्यामुळे आज अवोकाडो खाण्याचे फायदे पाहू.

Ruchika Jadhav

सध्याच्या युगात अन्नधान्य देखील विविध औषधांच्या फवारण्या करून पिकवले जाते. त्यामुळे कितीही सकस आहार घेतला तरी देखील आपण आजारी पडतो. त्यामुळे अनेक व्यक्ती विविध फळांचं सेवन करतात. तुम्ही देखील विविध फळांचं सेवन करत असाल पपयी, केळी, चिकू, लिची अशा विविध फळांसह आहारात अवोकाडोचा देखील समावेश केला पाहिजे. अवोकाडो या फळामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शिअम आणि जिवनस्त्व असतात. याचे सेवन केल्याने तुमच्या आरोग्याशी संबंधित विविध समस्या दूर होतील. त्यामुळे आज अवोकाडो खाण्याचे फायदे जाणून घेऊ.

वजन कमी करण्यास मदत

अवोकाडो खाल्ल्याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होते. अनेक व्यक्तींना फक्त बेली फॅटच्या समस्या असतात. त्यांच्यासाठी हे फळ अत्यंत उपयुक्त आहे. अवोकाडोमध्ये फायबर देखील असतं. त्यामुळे पोट बराचवेळ भरलेलं राहतं. जास्त भूक लागत नाही. त्यामुळे गरज नसताना आपण काही पदार्थाचं सेवनही करत नाही. असे केल्याने आपलं वजनही नियंत्रणात राहतं.

डायबिटीज नियंत्रणात

डायबिटीजच्या रुग्णांनी देखील जास्तप्रमाणात अवोकाडोचं सेवन केलं पाहिजे. अवोकाडो फळ खाल्ल्याने शरीरातील इंसुलीनचं प्रमाण वाढतं. त्यामुळे तुम्हाला टाईप २ डायबिटीज असेल तर आजपासूनच अवोकाडोचं सेवन करण्यास सुरुवात करा.

मजबुत हाडे

हाडांच्या मजबुतीसाठी अनेक व्यक्ती असं म्हणतात की नॉनव्हेजचं सेवन केलं पाहिजे. तर काही व्याक्ती ज्वारी, बाजरीच्या भाकरी खाण्याचा सल्ला देतात. मात्र तुम्ही यासर्वांसह अवोकाडो हे फळ देखील खाल्लं पाहिजे. त्याने तुमच्या पायांच्या आणि हातांच्या हाडांमध्ये मजबुती येईल.

हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं

अवोकाडो असं फळ आहे जे फक्त एक नाही तर पाच आजारांवर आणि समस्यांवर काम करतं. तुम्हाला हृदयात ब्लॉकेज किंवा हृदयाशी संबंधित अन्य काही समस्या असतील तर अवोकाडोचं सेवन करा. याचे सेवन केल्याने हार्ट पेशंटला हृदयविकाराचा धोका देखील उद्भवत नाही.

दृष्टी

अनेक व्यक्तींना अगदी लहान वयातच चष्मा लागतो. डोळ्यांसमोर सतत फोन असलेल्या मुलांना लहान वयातच दिसायला कमी होतं. त्यामुळे लवकरच त्यांना मोठ्या भिंगाचा चष्मा लागतो. अशा मुलांना देखील आहारात विविध फळांसह पपई आणि अवाकाडो खाण्यास द्यावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: लहानपणी गाई चरायला घेऊन जायच्या, लग्नासाठी कुटुंबाकडून दबाव, तरीही मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IAS सी वनमथी यांचा प्रवास

Pitru Paksha 2025 : पितृपक्ष ७ सप्टेंबरपासून सुरू, या 4 राशींनी वेळीच जाणून घ्या उपाय; अन्यथा...

Maharashtra Live News Update : मुंब्रात इमारतीचा सज्जा कोसलळा, एका महिलेचा मृत्यू

Husband Wife Clash : घटस्फोटित महिला दुसऱ्या पतीकडूनही पोटगीसाठी पात्र; हायकोर्टाचा निर्णय

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक गेमचेंजर ठरणार? रेड्डी की राधाकृष्णन, कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT