Health Tips SAAM TV
लाईफस्टाईल

Health Tips : मलायका, माधुरीसारखं पन्नाशीतही तारुण्य हवं? फॉलो करा 'या' टिप्स

Health Tips For Weight Loss : अभिनेत्री मलाईका अरोरा नेहमी तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. तुम्हाला ही तिच्या सारखी फिगर हवी असेल तर, तिचा फिटनेस फंडा फॉलो करा.

Mohini Sonar

आपण अनेक हिरोईन्सला पाहतो, तेव्हा एकच विषय डोक्यात येतो, तो म्हणजे या सगळ्या एवढ्या वयातही इतक्या तरुण कशा दिसतात? अर्थात त्या मेकअपही करत असतील पण तरीही त्याला त्यांच्या फिटनेसची जोड असते. म्हणूनच त्या इतक्या तरुण आणि आकर्षक दिसतात.

आता मलाईकाच पाहा ना, 50 वर्षांपेक्षाही जास्त वय असलेली अगदी तरुणींनाही लाजवेल असा तिचा फिटनेस आहे.तिची फिगर अगदी तरुण 20, 21 वर्षांच्या मुलींसारखी आहे. मात्र आता या आकर्षक शरिरयष्ठींचं एक कारण समोर आलंय. ते म्हणजे मलाईकाची जीवनशैली.

मलाईकाचा फिटनेस फंडा?

मलाईका अरोरा खान ही चांगली अभिनेत्री आहे. शिवाय तिनं स्वतःला खून छान मेंटेन ठेवलं आहे. त्यामुळे तिचे भरपूर चाहतेआहेत. दरम्यान तिने काही दिवसांपुर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करून ती रोज ड्रिंक घेत असल्याचं सांगिलतलं होत. त्या ड्रिंकमध्ये जिरे,ओवा आणि मेथीदाण्यांचा समावेश आहे. रोज सकाळी उपाशी पोटी हे ड्रिंक घेतल्यानं पोटावरची चरबी कमी होते आणि आकर्षक फिगर प्राप्त होते. त्यामुळे रोज सकाळी हे ड्रिंक प्यायला हवं.

रात्री एका ग्लासमध्ये जीरे, ओवा आणि मेथी दाणे भिजवून ठेवायचे आणि सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी ते पाणी प्यायचं. असं केल्यानं आपल्या पोटावरची चरबी कमी होते आणि आरोग्यही चांगलं राहतं. शिवाय हे पेय आपल्या शरीरात नॅचरल इन्सूलिन वाढवतं. जे शरीरासाठी फायदेशीर ठरतं. यासोबतच कमरेचा घेर कमी होऊन ताजेतवानंही वाटतं. त्यामुळे तुम्हीही एकदा जरुर हा मलाईकाचा नुसका ट्राय करा.

मलाईकाचे वैयक्तिक आयुष्य

मलाईका अरोरा ही सलमान खानचा भाऊ अरबाज खानची पत्नी होती. मात्र आता त्यांचा घटस्फोट झालाय. तिला एक 18 वर्षांचा मुलगाही आहे. सध्या ती बोनी कपूरचा मुलगा अर्जून कपूरसोबत रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, तरीही मलाईकाच्या वयाचा अंदाज येणं कठीण आहे. त्यामुळे आनंदी जीवनशैली आणि आरोग्यासाठी तिच्या या रुटीनच्या गोष्टींचा फायदा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: पवईत घराची भिंत कोसळली, १ जण गंभीर जखमी

Nitesh Rane : वाळू चोरणाऱ्यांचे हात तोडले पाहिजे; वाळू चोरीवरून मंत्री नितेश राणे आक्रमक

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला, कार डिव्हायडर तोडून ट्रकला धडकली, ६ मित्रांचा मृत्यू

Jalna : स्वातंत्र्यदिनी आंदोलन करणाऱ्याच्या कमरेत पोलीस अधिकाऱ्याने घातली लाथ, व्हिडीओ व्हायरल

Chanakya Niti : लग्नानंतर प्रेम कमी होऊ नये म्हणून हा गुपित मंत्र

SCROLL FOR NEXT