Benefits of betel Leaf  Saam TV
लाईफस्टाईल

Benefits of betel Leaf : नागवेलीची पाने तुम्ही कधी खाल्लीयेत का? वाचा आरोग्यासाठी असलेले चमत्कारीक फायदे

Health Tips : नागवेलीची पाने म्हणजे आपण जेवणानंतर खातो ती विड्याची पाने होय. ही पाने अनेक व्यक्तींच्या घरात हमखास मिळतात. या पानांचा आपल्या आरोग्यावर सुद्धा चांगला परिणाम होतो.

Ruchika Jadhav

आपल्या घरात अंगणामध्ये विविध औषधी झाडांसह नागवेलीचे झाड असणे देखील गरजेचे असते. नागवेलीच्या झाडाची पाने आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर आणि उपयुक्त असतात. त्यामुळे अनेक व्यक्ती आहारात याचे सेवन करतात. तुम्ही देखील निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी या पानांचे सेवन करू शकता.

नागवेलीची पाने म्हणजे काय?

नागवेलीची पाने असा शब्द ऐकून अनेकांना हा सापाचा प्रकार असल्याचं वाटलं असेल. मात्र तसे काहीही नाही. नागवेलीची पाने म्हणजे आपण जेवणानंतर खातो ती विड्याची पाने होय. ही पाने अनेक व्यक्तींच्या घरात हमखास मिळतात. या पानांचा आपल्या आरोग्यावर सुद्धा चांगला परिणाम होतो.

नागवेलीच्या पानांमधील गुणधर्म

नागवेलीची पाने जेवणानंतर खाल्ल्याने पोट सोफ होण्यास मदत होते.

याने आपल्या त्वचेचं सौंदर्य आणखी खुलतं. स्किन कोमल आणि चकचकीत होते.

जेवणाच्या विविध पदार्थांने तोंडातील दुर्गंधी नागवेलीच्या पानाने कमी होते.

सर्दी खोकला असे आजार नागवेलीची पाने नुसती धुवून खाल्ली करी बरा होतो.

या व्यक्तींनी नागवेलीची पाने खाऊ नयेत.

नागवेलीची पाने विविध आजारांवर उपयुक्त आहेत. मात्र ही पाने उष्ण असतात. त्यामुळे ठरावीक व्यक्तींनी याचे सेवन करणे टाळले पाहिजे. ज्या व्यक्तींना अॅसिडिटी आणि पित्ताचा त्रास आहे त्यांनी हे पान खाऊ नये.

काही व्यक्तींना रक्तात साखर किंवा मग उच्च आणि कमी रक्त दाबाचा त्रास होतो. त्यांनी जेवणानंतर नागवेलीची पाने खाऊ नयेत. जास्त उष्णता असेल त्या दिवसांत अन्य व्यक्तींनी देखील ही पाने खाऊ नयेत. नागवेलीची पाने खाल्ल्याने तोंडाची चव वाढते आणि वाताचा त्रास दूर होतो.

बाजारात विड्याच्या पानांची अनेक दुकाने आहेत. येथे तुम्हाला विविध फ्लेवरमध्ये मुखवासासाठी देखील अनोखे पान तयार करून दिले जाते. यामध्ये जेली, सुपारी आणि बडिशेपसह चुना देखील लावला जातो. असे पान आपल्या आरोग्यासाठी पूर्णता सुरक्षित आणि फायदेशीर नाही. त्यामुळे आरोग्यासाठी जर हवे असेल तर फक्त साधे नागवेलीचे पान खाणे उत्तम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fuel Crisis: राज्यात इंधन टंचाईचा भडका, पेट्रोल- डिझेलसाठी हाणामारी

Petrol-Diesel Price Hike: इंधनटंचाईतही दरवाढीचे चटके, गृहखर्चाचं बजेट कोलमडलं; सर्वसामान्य नागरिक चिंतेत

MHT-CET गुणवत्ता यादीत घोटाळा झाल्याचा आरोप; राज्य सीईटी सेलने स्पष्टीकरण देताना काय म्हटलं?

कांदा उत्पादकांचे कष्ट मातीमोल; कांद्याला फक्त सव्वा रुपया भाव, VIDEO

Ranveer Singh: बॉलिवूडमध्ये रणवीर सिंहवर बंदी? चित्रपट संघटनेने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT