Nagpur Crime : 22 कोटींसाठी सासऱ्याचा 'गेम': 17 लाखांची सुपारी , नात्याला संपवणारी महिला अधिकारी

Nagpur Crime News : एका क्लास वन महिला अधिका-यानं 22 कोटींच्या संपत्तीसाठी सास-याची सुपारी देऊन हत्या केल्याची खळबळजनक घटना नागपूरमध्ये घडलीय. हत्येसाठी सूनेनं कसा कट रचला?
Nagpur Crime
Nagpur CrimeSaam Digital

विनोद पाटील, साम टीव्ही प्रतिनिधी

एका क्लास वन महिला अधिका-यानं 22 कोटींच्या संपत्तीसाठी सास-याची सुपारी देऊन हत्या केल्याची खळबळजनक घटना नागपूरमध्ये घडलीय. हत्येसाठी सूनेनं कसा कट रचला? पोलिसांच्या तपासात सुनेच्या सुपारीचं बिंग कसं फुटलं यावरचा हा विशेष रिपोर्ट.

पैशांसाठी हत्या करण्याची घटना काही नवीन नाही. मात्र नागपुरात एका उच्च अधिकारी असलेल्या सुनेनं 22 कोटींच्या संपत्तीसाठी आपल्या सास-याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. एखाद्या सिनेमाच्या पटकथेलाही लाजवेल असा कट या सुनेनं सास-याला संपवण्यासाठी रचल्याचं पोलिसांच्या तपासात पुढं आलंय. अर्चना पुट्टेवार असं नगर रचना विभागात अधिकारी असलेल्या आरोपी महिलेचं नाव आहे.

त्याचं झालं असं की 22 मेरोजी नागपुरात हिट अँड रन प्रकरणात 82 वर्षांचे पुरूषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू झाला. मात्र पोलिसांच्या तपासाला उशीर होत असल्यानं त्यांच्या मुलगा डॉक्टर मनीष पुट्टेवार यांनी पोलिसांमागे तपासासाठी जोर लावला, त्यानंतर जी पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली आणि चक्रावून सोडणारी माहिती समोर आली.

Nagpur Crime
Mohan Bhagwat : सरसंघचालकांच्या सरकारला कानपिचक्या; केंद्रीय नेतृत्वावर संघ नाराज?

गडचिरोलीत नगर रचना विभागात क्लास वन अधिकारी असलेल्या अर्चना पुट्टेवारनं आपला चालक सार्थक बागळे याच्या मदतीनं नीरज निमजे आणि सचिन धार्मिक यांना 17 लाखांची सुपारी दिली. त्यानंतर 22 मे रोजी नागपूरच्या मानेवाडा चौकात नीरज आणि सचिनच्या कारनं पुरुषोत्तम पुट्टेवार यांना जोरदार धडक दिली. यात पुट्टेवारांचा जागीच मृत्यू झाला. या अपघात घडवून आणण्यासाठी अर्चनानं नवी कार विकत घेऊन दिली होती. या कटात तिचा भाऊही सहभागी होता. अर्चनानं सास-याला मारण्याचा 8 मे आणि 16 मेरोजीही प्रयत्न केला होता. मात्र हे प्रयत्न अपयशी ठरले होते. मात्र अखेर 22 मेरोजी अर्चनानं डाव साधला.

पतीनंच पोलिसांमागे तपासासाठी धोशा लावला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कसून तपासात या कटाचं बिंग फूटलं. सास-याच्या हत्येचा आरोप असणारी अर्चना पुट्टेवारवर नगर रचना विभागात भ्रष्टाचाराचे आरोपही झाले होते. पैशांसाठी भ्रष्टाचार करणारे अनेक अधिकारी तुम्ही पाहिले असतील. मात्र भ्रष्टाचाराचा पैसा कमी पडला म्हणून थेट संपत्तीसाठी सास-याला संपवणारी अर्चनासारखी महिला अधिकारी केवळ प्रशासनाच्याच नव्हे तर माणुसकीच्या नावावर काळिमा आहे.

Nagpur Crime
Maharashtra Politics 2024 : बीडच्या 'बाप्पा'चा अजित पवारांना फोन?: शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही खासदारफुटीची भीती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com