लोकसभा निवडणुकांनंतर केंद्रात एनडीएने सत्ता स्थापन केली आहे. मात्र आता खासदाराफुटीच्या चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटातील खासदार अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. अमोल मिटकरी यांनीही ट्विट करत बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांना फोन केल्याचा दाव केला आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी?
विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत अतिशय खालच्या पातळीवर टीका केली. त्याचा फटका अजित पवार गट आणि महायुतीवर झाला. मात्र लोकसभा निवडणुकात संपताच काहीजण अजित पवार यांच्या संपर्कात आहेत. बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांना फोन केला होता. जवळपास १० मिनिट फोनवर चर्चा झाली. बजरंग सोनवणे यांनी आपल्याला या संकटातून वाचवा अशी विनंती अजित पवारांकडे केल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे. तसच येणाऱ्या विधासभा निवडणुकीत लोकसभेचा वचपा काढणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर धनंजय मुंडे यांच्या जवळचे माणल्या जाणाऱ्या बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यामुळे बीडच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र जायन्ट किलर बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. याला एक आठवडाही होत नाही तोच बजरंग सोनावणे यांनी अजित पवार यांना फोन केल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.
अमोल मिटकरी यांनी एक्सवर, बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला असल्याचे म्हटल्याची खळबळजनक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी 'बीडच्या बाप्पाचा दादांना फोन' असं म्हटलं असून #मोठ्यामनाचादादा असा हॅशटॅग देखील बापरला आहे. त्यावर मिटकरी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, सोनवणे यांच्यानंतर दुपारी अडीच वाजताही एक फोन येऊन गेला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी तुम्हाला राज्याच्या राजकारणात वेगळे चित्र पाहायला मिळेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.