Chapati Making Saam Tv
लाईफस्टाईल

Cancer: तुम्हीसुद्धा अशापद्धतीने चपाती बनवता? वेळीच व्हा सावधान नाहीतर होऊ शकतो कॅन्सर

Chapati Making: चपाती बनवताना केलेली एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच सावधान होत काळजी घ्या आणि ही चूक पुन्हा करू नका. यासाठी आताच सवयी बदला...

Priya More

प्रत्येकाच्या घरामध्ये चपाती किंवा भाकरी ही बनवली जाते. चपाती किंवा भाकरीशिवाय अनेकांचे जेवण पूर्णच होत नाही. चपाती बनवता विशेष काळजी घेणं खूप गरजेचे आहे. चपाती किंवा भाकरी आधी तव्यावर भाजली जाते. त्यानंतर ही चपाती टम्म फुगावी यासाठी गॅसच्या आचेवर शेकली जाते. पण हे असं करणं आरोग्यासाठी घातक आहे. असं करणं का योग्य नाही हे आपण जाणून घेणार आहोत...

आधीच्या काळात चुलीवर भाकरी बनवताना आपण आधी ती तव्यावर भाजून घ्यायचो त्यानंतर चुलीबाहेर कोळसा काढून ती भाकरी त्या कोळश्यावर ठेवून टम्म फुगवायचो. हल्ली अनेक महिला याच पद्धतीचा वापर करतात आणि गॅसच्या आचेवर चपाती भाजतात. चपाती केल्यानंतर ती तव्यावर भाजली जाते त्यानंतर टम्म फुगवण्या यासाठी गॅसच्या आचेवर ठेवली जाते. अशाप्रकारच्या गरमा गरम चपाती खाणं अनेकांना खूप आवडते.

पण चपाती करण्याची ही पद्धत आपल्या आरोग्यासाठी खूपच हानिकारक आहे. अशा प्रकारे तयार केलेली चपाती खाल्ल्याने आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. एका संशोधनानुसार, जेव्हा अशा प्रकारे चपाती बनवली जाते तेव्हा त्यात HCA म्हणजे हेटेरोसायक्लिक अमाइन्स आणि PAH म्हणजे पॉलीसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स ही हानिकारक रसायने तयार होतात. ज्यामुळे कॅन्सरसारख्या समस्या निर्माण होतात.

चपाती बनवताना जर तुम्ही ती पूर्णपणे तव्यावरच भाजली तर ती आरोग्यासाठी घातक ठरत नाही. अशाप्रकारे तयार केलेली चपाती खाल्ल्यामुळे तुम्हाला कॅन्सर देखील होत नाही. त्यामुळे यापुढे चपाती बनवत असताना तुम्हीसुद्धा काळजी घ्या आणि इतर कोणी जर अशापद्धतीने चपाती बनवून खात असतील तर त्यांना देखील वेळीच सावध करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विद्यानंद बापट यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! खात्यात येणार १४ लाख रुपये, वाचा कॅलक्युलेशन

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! निवृत्तीचे वय आता ६२, महाराष्ट्रासह ७ राज्यांमध्ये नियम बदलणार

Cancer symptoms: वीकेंडची मजा ठरू शकते धोकादायक! रिलॅक्स होण्यासाठी केलेल्या ‘या’ सवयी वाढवतायत कॅन्सरचा धोका

Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी'चा विजेता झाला बाबा! जन्माष्टमीच्या मुहूर्तावर घरी आली लक्ष्मी, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT