Sakshi Sunil Jadhav
बऱ्याच वेळेस कामामधून वेळ न मिळाल्यामुळे घरी काही आवडीचे पदार्थ करणं जमत नाही.
पुढे आपण रव्यापासून कमीत कमीवेळात झटपट पुऱ्यांची रेसिपी जाणून घेणार आहोत.
रवा, गरम पाणी, उकडलेले बटाटे, मीठ, तिखट, हींग, जीरं,ओवा,कस्तुरी मेथी, कोथिंबीर, तेल, हिरवी मिर्ची, गव्हाचे पीठ इ.
गरम पाण्यात रवा भिजत ठेवा. उकडेले बटाटे किसून घ्या.
आता रव्यामध्ये बटाटा, मीठ, तिखट, हींग, जीरं, ओवा, हळद,कस्तुरी मेथी घाला.
आता बारिक कोथिंबीर, तेल आणि पीठ घालून कणीक मळा.
आता पीठाचे लहान लहान गोळे करून बारिक आकाराच्या पुऱ्या लाटा.
आता कढईत तेल चांगलं गरम करून पुऱ्या कुरकुरीत तळून घ्या.