ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लिव्हर आपल्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्याेच, निरोगी पचन राखण्याचे तसेच शरीराला उर्जा प्रदान करण्याचे काम करते.
तुमच्या चेहऱ्यावरुन तुमच्या लिव्हरचे आरोग्य कसे कळते, जाणून घ्या.
लिव्हर खराब झाल्यास त्वचेचा आणि डोळ्यातील पांढऱ्या भागाचा रंग पिवळा होतो.
जेव्हा एखाद्या व्यक्तीचे लिव्हर बिघडू लागते तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात त्यामुळे चेहऱ्यावर पिंप्लस येतात.
चेहऱ्यावर सूज येणे हे लिव्हर आणि किडनी खराब होत असल्याचे लक्षण आहे. यामध्ये विशेषतः डोळ्यांखाली सूज येते.
ओठांचा रंग बदलणे हे तुमच्या किडनीमध्ये काही समस्या असल्याचे दर्शवते. या लक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.
हात रक्तासारखे लाल दिसणे हे देखील लिव्हर योग्यरित्या कार्य करत नसल्याचे लक्षण आहे.