Health Tips : झोपेत अचानक झटका का बसतो? काय आहे मागचे नेमके कारण

Why You Feel Like You Are Falling in Bed : बऱ्याचदा आपण गाढ झोपेत असताना अचानक उंच ठिकाणावरून पडल्यासारखे वाटते आणि शरीराला एक तीव्र झटका बसतो, ज्यामुळे आपण दचकून जागे होतो.
Why You Feel Like You Are Falling in Bed
Why You Feel Like You Are Falling in Bedsaam tv
Published On: 

झोपेत असताना अचानक झटका बसणे म्हणजे काय?

तुम्हाला कधी झोपेत असताना असं वाटलं आहे का की तुम्ही एखाद्या उंच ठिकाणावरून खाली पडत आहात आणि अचानक शरीराला एक जोरचा झटका बसतो? बऱ्याचदा आपण गाढ झोपेत असताना किंवा झोप लागत असताना शरीराला असा अचानक झटका बसतो आणि आपण दचकून जागे होतो. या स्थितीला 'हिप्निक जर्क' किंवा 'स्लीप स्टार्ट' असं म्हणतात. वैद्यकीय भाषेनुसार, ही मिओक्लोनस नावाच्या स्नायूंच्या अचानक होणाऱ्या अनैच्छिक हालचालीचा एक प्रकार आहे.

हे घडण्यामागची कारणे काय आहेत?

तज्ज्ञांच्या मते, झोपेत असताना झटका बसणे सामान्य आहे आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात थकवा किंवा ताणतणाव असणे.

Why You Feel Like You Are Falling in Bed
चहाप्रेमींनो सावधान! चहासोबत चुकूनही खाऊ नका 'या' ५ गोष्टी, नाहीतर आतड्यांचा होईल सत्यानाश; वाचा सविस्तर

अतिथकवा किंवा झोप पूर्ण न होणे

दिवसभराच्या धावपळीमुळे किंवा तणावामुळे शरीर आणि मज्जासंस्था अतिशय थकलेली असते. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा मेंदू खूप वेगाने झोपेच्या सुरुवातीच्या म्हणजेच गाढ झोपेत जातो.

मानसिक ताण आणि चिंता

अतिविचार, कामाचा ताण किंवा चिंता यामुळे मेंदू सतत सतर्क स्थितीत राहतो. याचा परिणाम झोपेवर होऊन रात्री झोपेत असताना अचानक झटके बसू शकतात.

कॅफिनचे अधिक सेवन

संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स किंवा एनर्जी ड्रिंक्सच्या माध्यमातून जास्त प्रमाणात कॅफिन घेतल्यास झोप प्रभावित होते आणि स्नायू आकसण्याचे प्रकार वाढतात.

Why You Feel Like You Are Falling in Bed
Health Tips : डायबिटीजमध्ये वांगी खाणे आरोग्यासाठी कितपत फायदेशीर आहे? जाणून घ्या

झोपण्याची अयोग्य पद्धत

झोपण्याची चुकीची मुद्रा किंवा शरीराला पुरेशी विश्रांती न मिळाल्यामुळे देखील मेंदूला धोक्याचा आभास होतो आणि शरीर अचानक झटका देऊन प्रतिक्रिया देते.

हे एखाद्या आजाराचे लक्षण आहे का?

बहुतेक प्रकरणांमध्ये, झोपेत अचानक झटका बसणे ही कोणत्याही गंभीर आजाराची किंवा विकाराची खूण नसते. हे पूर्णपणे सामान्य मानले जाते. जगातील सुमारे ७०% लोकांच्या बाबतीत कधी ना कधी असा अनुभव आलेला असतो. परंतु, जर हे झटके वारंवार आणि खूप तीव्र स्वरूपात येत असतील, ज्यामुळे तुम्हाला झोप लागण्यात अडचण येत असेल, किंवा दिवसभर प्रचंड थकवा जाणवत असेल, तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

बचाव कसा करावा?

  • दररोज एकाच वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय ठेवा.

  • झोपण्यापूर्वी ध्यान करा, हलकी गाणी ऐका किंवा ताणतणाव दूर करणाऱ्या गोष्टी करा.

  • संध्याकाळनंतर कॉफी किंवा चहाचे सेवन करणे टाळा.

  • शांत आणि अंधाऱ्या खोलीत झोपल्याने मेंदूला शांतता मिळते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.

  • आरोग्याच्या बाततीत कोणत्याही समस्या आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.