health news  saam tv
लाईफस्टाईल

Chikoo Benefits: शरीरातील उष्णता कमी होते अन्...; उन्हाळ्यात चिकू खाणं ठरतं फायद्याचं, जाणून घ्या...

Start Your Day with Chikoo: शरीरासाठी फळ हे अत्यंत गुणकारी असतात, आपल्या आहारात फळांचा समावेश असला पाहिजे असे डॉक्टर नेहमीच सांगत असतात.

Omkar Sonawane

आपल्या जेवणात रोज एका तरी फळाचा समावेश असावा असे डॉक्टर नेहमीच सांगत असतात. कारण फळ्यांमध्ये अनेक पोषकतत्वे असतात. जी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्येच एक चिकू हे फळ फायदेशीर आहे. यामुळे शरीराला अद्भुत फायदे होतात.

तुम्ही जर सकाळी उपाशीपोटी चिकू खाल्ले, तर शरीराला अनेक पोषक तत्वे मिळतील. दररोज रिकाम्यापोटी चिकू खाल्ल्याने मेंदूला तसेच पोटाच्या आरोग्यालाही अनेक फायदे मिळतील. चिकू हे फळ हाडे मजबूत करण्यापासून तर रोगप्रतिकारशक्ति वाढवण्यापर्यंत चिकू मदत करतो. उन्हाळ्यात चिकू खाल्ल्याने आपल्या शरीराला थंडावा मिळतो.

चिकूमध्ये असलेल्या अॅंटीअॅक्सीडेन्ट गुणधर्म हे रोगप्रतिकर शक्ति वाढवण्याचे काम करतात. यामुळे कॅन्सरसारख्या रोगावर देखील मात करता येते. चिकू गोड, थंड आणि भरपूर औषधी गुणांनी भरलेले अगदी चविष्ट फळ आहे. उन्हाळ्यात दररोज सेवन केल्याने याचे तुम्हाला अद्भुत फायदे दिसतील. चिकू खाल्ल्याने शरीरात विशेष प्रकारचा उत्साह, ऊर्जा निर्माण होते/ यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते/ चिकूचा रस रक्तात मिसळून ऊर्जा निर्माण करतो. चिकूची साल ही ताप नाशक आहे. सलीमध्ये टॅनिन असते. आतड्यांसाठी चिकूचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरते. चिकूच्या बियांमध्ये सापोनीन आणि नावाचा कडवट घटक असतो. आजारपणात चिकू खाल्ल्याने तोंडाला चव येते. तर चिकूचा ज्यूसदेखील अनेक आजारांवर गुणकारी असल्याचे आयुर्वेद डॉक्टर सांगतात.

रोगप्रतिकार शक्ति वाढते

चिकू हे अॅंटीऑक्सीडंट आणि जीवनसत्वे यासारख्या खनिजानी समृद्ध असते. त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ति मजबूत ठेवण्यासाठी देखील चिकूचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.

पचनशक्ति चांगली होते

चिकूमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे तुमची पचनसंस्था चांगली होते आणि तुमचे शरीर निरोगी राहते. त्यामुळे तुम्ही रिकाम्यापोटी चिकू खाल्ला पाहिजे.

हाडे मजबूत होतात

रिकाम्यापोटी चिकू खाल्ल्याने तुम्हाला कॅल्शियमचा देखील मोठ्या प्रमाणात फायदा होतो. हे कॅल्शियम आपल्या हाडाची मजबूती करण्यासाठी उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे मुलांचा विकास करण्यासाठीही चिकू फायदेशीर आहे.

ग्लुकोजची मात्रा वाढवते.

चिकूमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. याच्या नियमित सेवनाने डोळ्यांची शक्ति वाढते. त्यात ग्लुकोजची मात्राही चांगली असते. जे लोक जास्त काम करतात त्यांना ऊर्जेची जास्त आवश्यकता असते. अशा लोकांनी चिकूचे नियमित सेवन करावे. त्यातील पॅलिफेनॅालिक या घटकामुळे मूळव्याध, अन्ननलिका दाह, जुलाब अशा आजारात चिकूचे सेवन केल्यास आराम मिळतो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

SCROLL FOR NEXT