
अलीकडच्या काळात लहान मुलांमध्ये High blood Pressure च्या तक्रारी वाढल्यात. उच्च रक्तदाब हा एक सायलेंट किलर मानला जातो. मुख्य म्हणजे याची लक्षणं फार नंतर दिसून येतात. अशा स्थितीत लहान मुलांमध्येही त्याची लक्षणं क्वचितच सुरुवातीच्या टप्प्यात दिसून येतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची जीवनशैली यामुळे मुलांना उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.
पुण्यातील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन हॉस्पिटलमधील वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. अभिमन्यू सेनगुप्ता यांनी सांगितलं की, उच्च रक्तदाब ही बहुतेकदा प्रौढांमधील एक आरोग्य समस्या मानली जाते. मात्र बदलत्या जीवनशैलीनुसार हल्ली किशोरवयीन मुलांमध्ये, या आजाराचे निदान मोठ्या प्रमाणात होत आहे. सुरुवातील लक्षणांच्या अभावामुळे अनेक प्रकरणांमध्ये निदान होत नसले तरी, उच्च रक्तदाबाचा मुलांच्या हृदय आणि महत्वाच्या अवयवांच्या कार्यांवर तसेच एकूण आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.
मुलांमध्ये उच्च रक्तदाब हा मूत्रपिंडाचा आजार, हृदयरोग, हार्मोनल विकार किंवा क्वचितच काही ट्यूमरशी संबंधित असू शकते, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये, विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये, कोणती लक्षण सुरुवातीला आढळून येत नाही.
उच्च रक्तदाबाचा कुटुंबिक इतिहास नसतानाही बहुतेकदा वाढते वजन किंवा लठ्ठपणामुळे मुलं रक्तदाबासारख्या समस्येचे शिकारी ठरतात. चुकीच्या जीवनशैलीमुळे एका ठिकाणी फार काळ बसून राहण्याच्या सवयीमुळे आणि जास्त प्रमाणात खारट किंवा प्रक्रिया केलेले पदार्थांचे सेवन केल्याने मुलांना रक्तदाबाची समस्या सतावते. ही समस्या मधुमेह, झोपेचे विकार आणि रक्तातील चरबीच्या असामान्य पातळीशी संबंधित आहे तसेच यामध्ये ‘कार्डिओमेटाबॉलिक सिंड्रोम'ची लक्षणे आढळून येतात.
बालपणातील उच्च रक्तदाब संबंधित लक्षणे बऱ्याचदा सुरुवातीच्या टप्प्यात आढळून येत नाही . काही प्रकरणांमध्ये मुलांना डोकेदुखी, चक्कर येणे, अस्पष्ट किंवा दुहेरी दृष्टी, उलट्या होणे, नाकातून रक्त येणे किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे अशी लक्षणं आढळतात.
पालकांनी अशा तज्ञाचा सल्ला घ्यावा जे त्यांच्या मुलांच्या आरोग्याचे योग्य मूल्यांकन करतील व उच्च रक्तदाबाचा धोका असल्यास त्याचा शोध घेतील. आवश्यकतेनुसार तपासणी करत वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.
जर तुमच्या मुलाला उच्च रक्तदाबाचे निदान झाले तर त्याचे उपचार हे त्याचे मूळ कारण आणि स्थितीच्या तीव्रतेवर अवलंबून असेल.
उच्च रक्तदाबाच्या अनेक प्रकरणांमध्ये निरोगी आहार, नियमित शारीरिक हालचाली आणि वजन व्यवस्थापन यासारख्या जीवनशैलीतील बदलांनी रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकतात. मुलाचा आहार आणि व्यायामाबाबत तज्ञांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.
मुलांनी नियमित ताजी फळे, भाज्या, तृणधान्य धान्य, डाळी आणि मसूर यांचा समावेश असलेला फायबरयुक्त आहार घ्यावा. जंक, तेलकट, मसालेदार, प्रक्रिया केलेले आणि कॅन केलेले अन्न पदार्थांचे सेवन टाळा. आहारात सोडियमचे प्रमाण नियंत्रित राखणे गरजेचे आहे.
वैद्यकिय स्थितीनुसार डॉक्टर मुलांना औषधं लिहून देऊ शकतात. भविष्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी योग्य निरीक्षण करणे आवश्यक आहे. मुलाला नियमित तपासणीसाठी तसेच फॅालोअप साठी डॅाक्टरांकडे न्यावे
मुलांमध्ये उच्च रक्तदाब रोखण्यासाठी, पालकांनी लहानपणापासूनच निरोगी सवयींना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. पालकांनी आणि कुटुंबातील थोरामोठ्यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून घरातील लहान मुलांसाठी आदर्श निर्माण केला पाहिजे. मुलांनी प्रक्रिया केलेले आणि खारट पदार्थांचे सेवन मर्यादित केले पाहिजे आणि सायकलिंग किंवा मैदानी खेळांसारख्या शारीरिक हालचालींमध्ये सहभागी व्हावे.
पालकांनी त्यांच्या मुलाचे वजन निरोगी राहील याची खात्री करावी. नियमित वैद्यकीय तपासणी ही उच्च रक्तदाबाचा कौटुंबिक इतिहास असलेल्या मुलांसाठी, सुरुवातीची लक्षणे शोधण्यास मदत करू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.