Baba Vanga: बापरे! बाबा वेंगांनी जसं सांगितलंय अगदी तसंच घडतंय, आयुष्य धोक्यात आणतंय एक डिव्हाईस

Baba Vanga Prediction: बाबा वेंगा यांच्या बऱ्याच भविष्यवाण्या खऱ्या ठरत असल्याचं समोर आलं आहे. यावेळी बाबा वेंगा यांची अजून एक भविष्यवाणी खरी ठरताना दिसतेय. यामध्ये स्मार्टफोनचे व्यसन मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि शैक्षणिक आरोग्यासाठी धोकादायक बनतंय.
Baba Vanga Prediction
Baba Vanga Predictionsaam tv
Published On

आतापर्यंत अनेकांनी विविध भविष्यवाण्या केल्या आहेत. यामध्ये बल्गेरियाचे बाबा वेंगा हे फार प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अचूक भाकितांसाठी प्रसिद्ध असलेले बाबा वेंगा यांनी आजच्या काळाबाबत ज्या भविष्यवाण्या केल्या होत्या त्या खऱ्या ठरल्या आहेत. त्यांनी अशा काळाचा संदर्भ दिला होता ज्यामध्ये मानव तंत्रज्ञानावर इतका अवलंबून राहील की तो त्यामुळे त्याच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला हानी पोहोचू शकते.

Baba Vanga Prediction
Baba Vanga Scary Predictions: जगाचा विनाश, मोठं युद्ध आणि...; बाबा वेंगा यांनी २०२५ बाबत काय भविष्यवाणी केली, पाहा

आपण पाहिलं तर आपल्या प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात ही स्मार्टफोनमुळे होते. आजच्या काळात जेव्हा प्रत्येक हातात स्मार्टफोन आहे. त्यामुळे आता बाबा वेंगा यांची भाकितं पुन्हा खरी ठरणार असं म्हटलं जातंय.

स्मार्टफोन हे एक मोठं संकट?

माणसाचं जीवन सुकर व्हावं यासाठी स्मार्टफोनची निर्मिती करण्यात आलं. मात्र सध्याच्या घडीला आपल्या हातात असलेला हाच स्मार्टफोन अनेक समस्यांचे मूळ बनलंय. त्याचा परिणाम अत्यंत चिंताजनक असून याचं प्रमाण लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांमध्ये जास्त दिसून आलंय. नुकतंच राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) केलेल्या एका अभ्यासात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

अभ्यासातून काय आलं समोर?

या अभ्यासानुसार असं समोर आलंय की, सुमारे २४% मुलं झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर करतात. मुख्य म्हणजे याचा थेट परिणाम मुलांच्या झोपेवर तसंच लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर होतो. इतकंच नाही तर मुलांच्या अभ्यासावरही याचा परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे. अपुऱ्या झोपेमुळे या मुलांमध्ये चिडचिडेपणा, थकवा जाणवत आहे.

Baba Vanga Prediction
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची मोठी भविष्यवाणी, २०४३ पर्यंत सर्वत्र मुस्लिमांचं वर्चस्व आणि म्हणाले..

मानसिक समस्याही वाढतात

स्मार्टफोनचा जास्त प्रमाणात वापर केल्याने झोपेलाच नाही तर मानसिक आरोग्यालाही हानी पोहोचवते. मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिंता, नैराश्य यांसारख्या मानसिक समस्या वाढत आहेत. मुलांचा स्क्रिन टाईम वाढल्यामुळे ती नीट खेळू शकत नाहीत किंवा कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवू शकत नाहीत.

Baba Vanga Prediction
Baba Vanga: बाबा वेंगा यांची फोनबाबत हादरवून टाकणारी भविष्यवाणी; वाचून प्रत्येकाचीच झोप उडेल

टेक्नॉलॉजीशी प्रमाणात मैत्री करा

सध्याच्या काळात टेक्नॉलॉजीचा वापर चुकीचा नाही. मात्र आपण हा वापर किती प्रमाणात करतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. जर याचं आपल्याला व्यसन लागलं तर ते प्रचंड धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे बाबा वेंगा यांनी ज्या धोक्याकडे इशारा दिला आहे तो आता समोर आलाय, असं म्हणणं चुकीचं ठरणार आहे. त्यामुळे आपल्याला वेळीच जाणीव करून येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य या डिजिटल जगात हरवू नये याची काळजी घेतली पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com