Tulsi Seeds Benefits Saam Tv
लाईफस्टाईल

Tulsi Seeds Benefits : तुळशीच्या छोट्याश्या बियांचे आरोग्याला आहेत आश्चर्यकारक फायदे, वाचा सविस्तर

Shraddha Thik

Benefits Of Tulsi Seeds : चुकीच्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयीही बदलल्या आहेत. यामुळे लोकांना शरीरातील उष्णता तसेच अनेकदा पोटाशी संबंधित समस्या उद्भवतात. पोटातील उष्णतेमुळे लोकांना अ‍ॅसिडिटी, जळजळ, अपचन आणि गॅसचा त्रास होतो.

अशा परिस्थितीत सब्जा हे तुमच्या पोटातील वाढलेली उष्णता कायमस्वरूपी घालवू शकतात. आहारात सब्जाचा समावेश केल्यास पोटाच्या समस्या टाळता येतात. तुळशीच्या बिया म्हणजेच सब्जा हे भरपूर पोषक असतात. चला जाणून घेऊया त्याचे 5 मोठे फायदे (Benefits) काय आहेत.

तुळशीच्या बियांचे फायदे

पचन

तुळशीची बियांने म्हणजेच सब्जामध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे ते खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. अ‍ॅसिडिटी आणि छातीत जळजळ होण्याची समस्या असलेल्या लोकांनी सब्जा भिजवून खावे. हे खाल्ल्याने अपचन आणि पोटाची उष्णता कमी होऊन पचनक्रिया सुधारते.

रक्तातील साखरेची पातळी

सब्जा खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रत्रीत राहते. मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांनी याचे सेवन करावे, सब्जा खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्याची समस्या कमी होते.

वजन कमी

वजन आणि लठ्ठपणाचा त्रास असलेल्या लोकांसाठीही सब्जा फायदेशीर आहे. हे खाल्ल्याने तुमचे पोट जास्त काळ फायबरमुळे भरलेले राहते आणि तुम्हाला भूक कमी लागते.

रोग प्रतिकारशक्ती वाढवणे

सब्जा खाल्ल्याने रोगप्रतिकारक (Immunity) शक्ती वाढते, त्यामुळे तुम्ही सर्दी-खोकला यांसारख्या समस्या टाळू शकता. जेव्हा प्रतिकारशक्ती चांगली असते तेव्हा संसर्ग सहजासहजी होत नाही आणि तुम्ही तंदुरुस्त राहता.

त्वचा आणि केसांसाठी फायदे

तुम्ही तुमची त्वचा सुधारू शकता आणि तुमचे केस चांगले बनवू शकता. रोज सब्जा खाल्ल्याने कोलेजनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे त्वचेच्या नवीन पेशी येण्यास मदत होते. सब्जामध्ये लोह, व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असते जे केसांच्या वाढीसाठी चांगले असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT