Tulsi Benefits : हिवाळ्यात करा तुळशीचे नियमित सेवन, अनेक आजारांपासून होईल बचाव!

तुळशीमध्ये अनेक गुणधर्म आढळतात त्यामुळे आयुर्वेदातही तुळशीला खूप महत्त्व दिले जाते.
Tulsi Benefits
Tulsi BenefitsSaam Tv

Tulsi Benefits : ग्रामीण भागात प्रत्येक घरांसमोर वृंदावन दिसेल तसेच शहरामध्ये जागेची कमतरता असली तरी एक छोटेसे तुळशीचे रोपटे प्रत्येक घरात दिसते. तुळशीमध्ये अनेक गुणधर्म आढळतात त्यामुळे आयुर्वेदातही तुळशीला खूप महत्त्व दिले जाते.

तुळशीचा उपयोग वनऔषधी मध्ये प्राचीन काळापासून सुरू आहे. तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटिव्हायरल, अँटीफंगल, मल्टी-फंक्शनल इत्यादी गुणधर्म असतात.या सर्व गोष्टी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर समजल्या जातात.

Tulsi Benefits
Benefits Of Tulsi : रिकाम्या पोटी तुळशीची पाने चघळल्यास होतील 'या' 5 समस्या दूर !

जरी आपल्या इथे घराघरात तुळस आढळत असली. तरी बऱ्याच लोकांना तुळशी पासून आरोग्यदायी फायद्याविषयी माहिती नाही. चला तर मग आज जाणून घेऊया हिवाळ्यात तुम्ही तुळशीचे दैनंदिन जीवनात समाविष्ट करून आरोग्याला अनेक फायदे मिळवू शकता.

1. तुळशीचा चहा

सकाळी उठल्यावर बऱ्याच लोकांना चहा लागतो.त्यामुळे चहा बनवताना त्यात तुळशीचे पाने टाका हा चहा चवीला खूप छान लागतो आणि त्यासोबतच याचा तुमच्या आरोग्याला फायदाही होईल. श्वासोच्छ्वासच्या समस्या असतील तर त्यावर उपचार म्हणून तुम्ही हा उपाय करू शकता. तसेच दररोज एक कप तुळशीचा चहा प्यायल्याने तुम्हाला दिवसभर उत्साही राहण्यास मदत मिळेल.

2. तुळशीचे पाणी

जर तुम्ही चहा घेत नसाल तर एक ग्लास तुळशीचे पाणी (Water) पिणे हा एक उत्तम पर्याय आहे.त्यासाठी एका पातेल्यात थोडे पाणी आणि मूठभर तुळशीचे पाणी टाका आणि हे पाणी छान उकळून घ्या असे दिवसातून दोनदा पिणे गरजेचे आहे तरच तुमच्या आरोग्याचा (Health) फायदा (Benfits) होईल.

3. तुळशीच्या रसाचे सेवन

तुमच्या आवडीच्या पेयांमध्ये तुम्ही तुळस टाकून त्याची चव अधिक वाढवू शकता.त्यामुळे घरी एक ग्लास रस तयार करताना त्यामध्ये 12-13 तुळशीची पाने टाकून हा रस तुम्ही पिऊ शकता याने तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतील.

Tulsi Benefits
Tulsi Benefits Canva

4. रक्तदाब

तुळशीमध्ये असलेले संयुगे ज्यामुळे रक्तदाब कमी करण्यास मदत होते त्यामुळे जर तुम्हाला उच्च रक्तदाबाच्या समस्या असतील तर तुम्ही तुळशीचा वापर करू शकता. शरीरातील सूज कमी करण्यासाठी ही तुळस उपयुक्त असते.

5. सर्दी-खोकलासाठी उपयुक्त

हिवाळ्यामध्ये अनेक लोकांना सर्दी खोकल्याच्या समस्या जाणवतात. तुळशीमध्ये युजेनॉल असते जे सर्दी खोकला आणि ताप कमी करण्यास मदत करणे. त्यामुळे तुळशीचा वापर करून सर्दी खोकल्याच्या त्रासापासून आराम मिळू शकतात.

6. तुळशीचे पाने

तुमचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी तुम्ही नुसती मूठभर तुळशीचे पाने देखील खाऊ शकता. यामुळे तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होऊ शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com