Benefits Of Tulsi : रिकाम्या पोटी तुळशीची पाने चघळल्यास होतील 'या' 5 समस्या दूर !

आयुर्वेदात तुळशीच्या रोपाला वरदान असल्याचे म्हटले आहे. त्याची पाने औषध म्हणून वापरली जातात
Benefits Of Tulsi
Benefits Of Tulsi Saam Tv
Published On

Benefits Of Tulsi : तुळशीला धार्मिक कार्यात जितके महत्त्व आहे तितकेच आरोग्यात देखील आहे. तुळशीचे आरोग्याला अनेक फायदे होतात. आयुर्वेदात तुळशीच्या रोपाला वरदान असल्याचे म्हटले आहे. त्याची पाने औषध म्हणून वापरली जातात.

तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. अनेक रोग बरे करण्यास आणि शरीराची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीही तुळशी खूप प्रभावी आहे. तुळशीच्या पाण्याचे आरोग्य मिळविण्यासाठी रोज हे पाणी रोज घ्या. (Latest Marthi News)

Benefits Of Tulsi
Winter Health Tips : हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास होतोय ? 'या' टिप्स फॉलो करा

तुळशीच्या पानांचे नियमित सेवन केल्याने व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि संसर्गजन्य रोग दूर राहतात. चला जाणून घेऊया सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने चघळण्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत.

1. तणाव दूर होतो-

एका संशोधनात असे आढळून आले आहे की, तुळशीच्या पानांमध्ये तणाव कमी करणारे हार्मोन्स म्हणजेच कोर्टिसोल असते. दररोज रिकाम्या पोटी तुळशीची 12 पाने चघळल्याने तणाव दूर होण्यास मदत मिळते.

2. मधुमेह नियंत्रणात राहातो -

तुळशीमध्ये युजेनॉल, मिथाइल युजेनॉल आणि कॅरिओफिलीन सारखे घटक आढळतात, ज्यामुळे स्वादुपिंडाच्या बीटा पेशी योग्यरित्या कार्य करतात. त्यामुळे शरीरात इन्सुलिनचे प्रमाण टिकून राहते आणि रक्तातील साखरेची (Sugar) पातळीही ठीक राहते. जे मधुमेहापासून (Diabetes) बचाव करते.

Benefits Of Tulsi
Diabetes Control Tips : मधुमेहासाठी रामबाण आहे 'या' मसाल्याचे पाणी, रक्तातील साखरेची पातळी देखील राहाते नियंत्रणात

3. तोंडाची दुर्गंधी-

तोंडाला दुर्गंधी येत असेल तर तुळशीची काही पाने चावा. यामुळे श्वासाची दुर्गंधी दूर होईल.

4. डोकेदुखी आणि सर्दीच्या तक्रारी

जर एखाद्या व्यक्तीला सायनुसायटिस, अॅलर्जी, डोकेदुखी आणि सर्दीची तक्रार असेल तर तुळशीची पाने पाण्यात चांगले उकळून गाळून घ्या. यानंतर फिल्टर केलेले पाणी थोडे थोडे प्या. असे केल्याने डोकेदुखीपासून आराम मिळेल.

5. घसा खवखवणे-

तुळशीची पाने पाण्यात टाकून चांगली उकळा. यानंतर हे पाणी प्यायल्याने घसादुखीपासून लवकरच आराम मिळेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com