ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घरात लावलेले तुळशीचे रोप केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही खूप फायदेशीर मानले जाते.
आयुर्वेदात तुळशीच्या रोपाला वरदान असल्याचे म्हटले आहे. तुळशीची पाने औषध म्हणून वापरली जातात.
तुळशीच्या पानांचे नियमित सेवन केल्याने व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि संसर्गजन्य रोग दूर राहतात.
सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
तुळशीच्या पानांमध्ये तणाव कमी करणारे हार्मोन म्हणजेच कोर्टिसोल आढळते. दररोज रिकाम्या पोटी तुळशीची १२ पाने चघळल्याने तणाव दूर होतो.
तुळशीमध्ये युजेनॉल, मिथाइल युजेनॉल आणि कॅरिओफिलीन सारखे घटक आढळतात, ज्यामुळे पॅन्क्रीएटिक बीटा सेल्स योग्य प्रकारे काम करतात. त्यामुळे शरीरात इन्सुलिनचे प्रमाण टिकून राहते आणि रक्तातील साखरेची पातळीही ठीक राहते. जे मधुमेहापासून बचाव करते.
श्वासात दुर्गंधी येत असेल तर तुळशीची काही पाने चावून खावी. यामुळे श्वासाची दुर्गंधी दूर होईल.
एखाद्या व्यक्तीला सायनस, एलर्जी, डोकेदुखी आणि सर्दीची तक्रार असल्यास तुळशीची पाने पाण्यात चांगले उकळून गाळून घ्या.
तुळशीची पाने पाण्यात टाकून चांगले उकळा. यानंतर हे पाणी प्यायल्याने घसादुखीपासून लवकरच आराम मिळेल.