कोमल दामुद्रे
तुळशीला केवळ धार्मिकच नाही तर औषधीही महत्त्व आहे.
बहुतेक घरांमध्ये तुळशीचे रोप असते आणि लोक तुळशीची पूजा करतात.
हिंदू धर्मात तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते.
असे मानले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे धनाची देवी लक्ष्मी वास करते.
वास्तुशास्त्रात तुळशीला घरात ठेवणे, तिची पूजा करणे आणि जल अर्पण करण्याचे काही नियम सांगितले आहेत.
जसे की- रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी अर्पण करू नये.
तुळशीला घाणेरड्या हातांनी किंवा आंघोळ केल्याशिवाय स्पर्श करू नये, तुळशीच्या रोपाजवळ नेहमी स्वच्छता असावी.
त्याचप्रमाणे घरामध्ये कोणते तुळशीचे रोप जास्त शुभ असते.
रामा तुळशीचा रंग हिरवा असून त्याची पाने खाण्यास गोड लागतात.
ही तुळशी भगवान रामाला अत्यंत प्रिय असल्याने तिला राम तुळशी म्हणतात.
वास्तुशास्त्रानुसार राम तुळशीला घरात लावण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते.
हे घरामध्ये आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते.
राम तुळशीची पूजा विशेष शुभ मानली जाते.
दुसरीकडे, श्यामा तुळशी देखील शुभ आहे, परंतु ती बहुतेक औषधी म्हणून वापरली जाते