Teacher's Day 2023 Wishes In Marathi  Saam tv
लाईफस्टाईल

शिक्षक दिन शुभेच्छा | Teacher's Day 2023 Wishes | गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु... आवडत्या शिक्षकांना पाठवा खास शुभेच्छा, मिळेल आशीर्वाद

Teacher's Day Celebration : भारतात दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो.

कोमल दामुद्रे

Happy Teachers Day 2023 Message In Marathi

आपल्या जीवनाला योग्य ती कलाटणी देणारे हे शिक्षक असतात. त्याचे आपल्या जीवनात अभूतपूर्व स्थान आहे. त्यामुळे आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. भारतात दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो.

हा दिवस भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती म्हणून ओळखला जातो. हा दिवस खास करण्यासाठी अनेक लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गुरुंना शुभेच्छा देतात अशावेळी तुम्हालाही तुमच्या लाडक्या आणि आवडत्या गुरुंप्रती प्रेम व्यक्त करायचे असेल ते हे कोट्स Facebook, WhatsApp च्या माध्यामातून तुम्ही त्यांना पाठवू शकता.

1. गुरुविण (Guru) न मिळे ज्ञान,

ज्ञानाविण न होई जगी सन्मान..

जीवनभवसागर तराया,

चला वंदु गुरूराया..

शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

2. शिकवता शिकवता आपणास आकाशाला

गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे

आदराचे स्थान म्हणजे आपले शिक्षक

शिक्षकदिनाच्या (Teachers) हार्दिक शुभेच्छा!

3. गुरुब्रम्हा

गुरुविष्णु

गुरुदेवी महेश्वरा

गुरुसाक्षात परब्रम्ह

तस्मै श्री गुरुवे नमः

शिक्षक दिनाच्या शुभेच्छा,सादर प्रणाम !

4. माता गुरू आहे, पिताही गुरू आहे.

विद्यालयातील शिक्षक गुरू आहेत.

ज्यांच्याकडून आम्हाला शिकायला

मिळालं त्या सर्व व्यक्ती गुरू आहेत.

या शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व

गुरूजनांना कोटी कोटी प्रणाम.

शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!

5. सूर्य (Surya) किरण जर उगवले नसते,

तर आकाशाचा रंगच समजला नसता,

जर महात्मा जोतिबा फुले जन्मले नसते,

तर खरचं स्त्री शिक्षणाचे महत्व समजले नसते

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

6. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा..

गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..

गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती..

गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य..

आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना..

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

7. हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु

जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ए डुबे देख; संजय राऊतांची भाजप खासदार निशिकांत दुबेंवर टीका

Suspicious Boat : रायगड संशयित बोट प्रकरणात महत्त्वाचा खुलासा, पाकिस्तानवरुन वाहून आलेली संशयित वस्तू...

Kitchen Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार रात्री किचनमध्ये खरकटी भांडी का ठेवू नयेत?

Rasgulla Recipe: मऊसूत आणि टेस्टी रसगुल्ला घरच्या घरी बनवा फक्त ३० मिनिटांत

माता न तू वैरिणी! चिमुकलीला अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच आई...; ठाण्यातील खळबळजनक घटना|VIDEO

SCROLL FOR NEXT