Thick Hair Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Thick Hair Home Remedies : टक्कल झालं तरी पुन्हा केस उगवतील; फॉलो करा हे रामबाण उपाय

Hair Treatment : अनेक व्यक्तींना केस गळतीच्या समस्या देखील उद्भवतात. काही व्यक्तींना केस गळण्याच्या समस्या इतक्या जास्त असतात की, त्यामध्ये वयाच्या तिशीमध्येच व्यक्तीचं टक्कल पडू लागतं.

साम टिव्ही ब्युरो

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या शरीराला हवं तसं प्रोटीन मिळत नाही. प्रोटीन मिळत नसल्याने त्या व्यक्तीच्या आरोग्यावर याचा परिणाम दिसतो. अनेक व्यक्तींना केस गळतीच्या समस्या देखील उद्भवतात. काही व्यक्तींना केस गळण्याच्या समस्या इतक्या जास्त असतात की, त्यामध्ये वयाच्या तिशीमध्येच व्यक्तीचं टक्कल पडू लागतं.

अनेक व्यक्तींना अशा पद्धतीने टक्कल पडलेलं आहे. कमी वयात केस गळू लागल्यावर त्यावर वेळीच लक्ष द्यायला हवे. मात्र तसे न केल्याने व्यक्तीला पूर्णता टक्कल पडतं. टक्कल पडल्याने वय देखील जास्त वाढलेलं वाटतं. आपला आत्मविश्वास कमी पडतो. त्यामुळे आज केस गळती रोखण्यासाठी आणि टक्कल पडल्यावर सुद्धा केस कसे वाढतील यासाठी काय करावे याची माहिती जाणून घेणार आहोत.

डायचा वापर बंद करा

अनेक व्यक्तींना सुरुवातीला केस पांढरे होण्याची समस्या जाणवते. केस पांढरे झाल्याने त्यावर सर्वजण डाय अप्लाय करतात. मात्र डाय वापरल्याने त्यात केमीकल असते. केमीकलमुळे केस जास्त गळतात. त्यामुळे सर्वात आधी असे डाय वापरणे बंद करा.

जास्वंद, एरंडेल तेल

सर्वात आधी एरंडेल तेल घ्या आणि त्यामध्ये जास्वंदाची पाने मिक्स करा. या तेलात कडीपत्त्याची पाने सुद्धा उकळवून घ्या. हे तेल केसांना लावल्याने केस जास्त मजबूत होतात. तसेच केस गळणे सुद्धा बंद होते.

डॉक्टरांचा सल्ला

अनेकदा व्यक्तींना आरोग्याशी संबंधीत काही समस्या असतात. यामध्ये स्किन प्रॉब्लेम देखील होतात. त्यामुळे केसांत कोंडा होतो. केसांत कोंडा झाल्याने देखील केस जास्त गळतात. यावर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला न घेता उपाय केले तर आरोग्यावर त्याचा उलट परिणाम होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreya Bugde: लाल साडीत खुलून दिसतेय श्रेया बुगडे

Viral Video: बाईई काय हा प्रकार! लॅपटॉपवर बनवल्या पुऱ्या, महिलेचा जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Hartalika Vrat 2025: हरतालिका व्रताच्या दिवशी 'या' गोष्टी दान करा, मिळेल दुप्पट पुण्यफळ

Paneer Chilli: रेस्टॉरंट स्टाईल पनीर चिली कशी बनवायची? सोपी रेसिपी वाचा

Maharashtra Live News Update: मावळच्या शेतकऱ्यांचा रिंग रोडला तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT