Bharat Jadhav
आपल्या डोक्यावरी घनदाट केसं आपल्या सौंदर्यात वाढ करत असतात. केसांना डोक्याचा मुकूट देखील म्हटलं जातं.
केस पांढरे होण्याच्या समस्येने अनेकजण चिंताग्रस्त आहेत. कमी वयातच केस पांढरे होत असल्याने अनेकजण चिंताग्रस्त आहेत.
केस पांढरे होत असल्याचं पाहिल्यानंतर अनेकजण घरगुती उपाय करत परत केस काळे करण्याचा प्रयत्न करतात. लाखो उपाय ते अवलंबत असतात.
एक केस पांढरा दिसला आणि तो आपण उपटला तर डोक्यावरील सर्व केस पांढरे होऊ लागतात. पांढऱ्या केसांविषयी ह मिथ्य अनेकांच्या डोक्यात आहे.
केस काळे ठेवणाऱ्या पेशी परिपक्व होण्याची क्षमता गमावल्याने केस पांढरे होऊ लागतात, असं अमेरिकेचा शास्त्रज्ञ म्हणतात.
न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या मते, आपल्या त्वचेत असलेल्या रोम छिद्रांमधून केस बाहेर येतात. केस काळे ठेवणाऱ्या पेशी याच ठिकाणी असतात.
न्यूयॉर्क विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा या पेशी स्टेम पेशींपासून तयार होत नाहीत तेव्हा केस पांढरे होऊ लागतात.
केसांना काळा रंग हे मेलेनिनपासून मिळतो. हे मेलेनिन आपल्या केसांमध्ये,डोळे आणि त्वचेत आढळणारे पिग्मेंट असते.
वय वाढल्यानंतर या पिग्मेंटचे प्रमाण कमी होत असते आणि मेलेनिनचं उत्पादन कमी होऊ लागते.
डॉक्टरांच्या मते, एक पांढरे केस उपटल्याने सर्व केस पांढरे होत नाहीत. मेलेनिन पिग्मेंटचे प्रमाण कमी होण्याने केस पांढरे होत असतात. पण केस उपटल्याने हेअर फॉलिकल्सचं नुकसान होतं आणि केसांची वाढ खुंटते.
येथे क्लिक करा