ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बदलत्या जीवनशैलीचा महिलांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या केसांवर परिणाम लगेच दिसून येतो.
पावसाळ्यात वातावरणातील बदलांमुळे आणि आद्रतेमुळे केस गळतीची समस्या उद्भवू शकते.
केसांची काळजी घेण्यासाठी केसांना आठवड्यातून दोन वेळा तेल मसाज करणे आवश्यक आहे.
केसांची निगा राखण्यासाठी कढपत्ता सुद्धा उपयुक्त ठरतो. त्यामधील पोषक घटक केसांची निगा राखते.
केसांना कोमट कढीपत्त्याचे तेल लावल्यामुळे केसगळतीची समस्या दूर होऊ शकते.
कढीपत्त्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे केसांच्या समस्या दूर होतात.
केसगळतीची समस्या दूर करण्यासाठी केसांना कढीपत्ता आणि कडूलिंबाच्या पानांचा मास्क लावा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.