ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकदा वयानुसार किंवा काही व्यक्तींना गोष्टी विसरण्याची सवय असते.
तुम्हाला माहिती आहे का स्मरणशक्ती जर चांगली करायची असल्यास काही योगासने करणे फायदेशीर ठरते.
चला तर पाहूयात स्मरणशक्ती वाढवण्यासाठी कोणती योगासने केली पाहिजेत.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वृक्षासन आसन करणे चांगले समजले जाते.
स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी गरुडासन करणे फायदेशीर ठरते.
दररोज सकाळी बालासन केल्याने स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते.
शवासन केल्यानेही स्मरणशक्ती तसेच एकाग्रता वाढण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.