Wax at Home Saam TV
लाईफस्टाईल

Wax at Home : फक्त ५० रुपयांत घरच्याघरी करा वॅक्स; स्किन होईल सॉफ्ट आणि स्मूथ

Hair Removal Wax at Home : तुम्हाला सुद्धा वॅक्ससाठी लागणारा खर्च कमी करायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही सिंपल ट्रिक आणल्या आहेत. या ट्रिक्सच्या मदतीने तुमचा खर्च निम्म्याहून नम्मा कमी होईल.

Ruchika Jadhav

प्रत्येक व्यक्तीच्या हातावर आणि पायांवर केस असतात. त्यामुळे मुली दर महिन्याला पार्लरमध्ये जाऊन वॅक्स करतात. पार्लरमध्ये वॅक्ससाठी गेल्यावर बरेच पैसे खर्च होतात. हा खर्च काही महिलांना परवडत नाही. आता तुम्हाला सुद्धा वॅक्ससाठी लागणारा खर्च कमी करायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही सिंपल ट्रिक आणल्या आहेत. या ट्रिक्सच्या मदतीने तुमचा खर्च निम्म्याहून नम्मा कमी होईल.

वॅक्स करण्यासाठी पार्लरमध्ये तुम्हाला ५०० रुपयांचा खर्च येत असेल तर अगदी ५० रुपयांत सुद्धा तुम्ही घरच्याघरी वॅक्स करू शकता. त्यासाठी सर्वात आधी पार्लरमध्ये जाण्यापेक्षा घरीच वॅक्स कसे करावे याची माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. चला तर मग आज घरच्याघरी आणि पैशांची बचत करत वॅक्स कसं करतात याची माहिती जाणून घेऊ.

वॅक्स तुम्हाला घरीच बनवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला जास्त साहित्य लागत नाही. घरातील किचनमध्ये असलेल्या गोष्टींपासूनच वॅक्स तयार होतं. त्यासाठी बाहेरून २५ ते ५० रुपये खर्च करून तुम्हाला फक्त मध विकत घ्यावे लागेल. मध आपल्या स्किनसाठी चांगलं असतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा मध घरात नसेल तर त्याची एक छोटी बॉटल विकत घेऊन या.

वॅक्स बनवण्यासाठी साहित्य

पाणी - १ कप

साखर - १ कप

लिंबाचा रस - १/४ कप

मध - २ चमचे

वॅक्स स्ट्रिप्स - तुमच्या आवश्यकतेनुसार

वॅक्स कसे करायचे?

वॅक्स करण्यासाठी सर्वात आधी एक भांडे घ्या. त्यामध्ये पाणी आणि साखर मिक्स करा. साखर विरघळू लागली की यामध्ये मध मिक्स करा. त्यानंतर लिंबाचा रस सुद्धा मिक्स करून घ्या. या सर्व मीश्रणाला चांगली उकळी येऊ द्या. उकळी आल्यावर सुद्धा गॅस बारीक ठेवा. सर्व मिश्रण जेव्हा व्यवस्थित घट्ट होईल त्यानंतर गॅस बंद करा.

गॅस बंद करून हे मिश्रण नॉर्मल टेंप्रेचरवर येऊ द्या. पुढे एका काचेच्या डब्ब्यात किंवा बॉटलमध्ये सर्व काही भरून ठेवा. त्यानंतर हे मिश्रण पूर्ण घट्ट होते. वॅक्स करताना वॅक्स बाउलमध्ये तुमच्या गरजेनुसार वॅक्स काढून घ्या. वॅक्स अगदी पातळ झाल्यावर ते हेअर ग्रोथ ज्या दिशेने आहे त्याच दिशेने अप्लाय करा. त्यानंतर त्यावर स्ट्रिप्स चिटकवून घ्या.

स्टिप्स हेअरवर लावल्यानंतर हेअर ग्रोथच्या विरुद्धा दिशेने स्ट्रिप्स खेचा आणि रिजल्ट पाहा. एका झटक्यात वॅक्समुळे तुमची स्किन सॉफ्ट आणि स्मूथ झालेली दिसेल. अशा पद्धतीने तुम्ही वॅक्स केल्यास कमी खर्चात तुम्हाला जास्त चांगला रिजल्ट मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Horoscope: 'या' ५ राशींच्या नशिबाचे चमकतील तारे; यशासह धनलाभाचा योग, जाणून तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT