Allu Arjun Wax Statue
Allu Arjun Wax StatueSaam Tv

'Pushpa 2'फेम अल्लू अर्जुनचा दुबईतल्या प्रसिद्ध म्युझियममध्ये मेणाचा पुतळा, फोटो पाहून खऱ्या अभिनेत्याला ओळखणं झालं कठीण

Allu Arjun Wax Statue: अल्लू अर्जुन 'पुष्पा 2: द रुल'साठी सध्या चर्चेत आहे. त्याचवेळी 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाच्या पहिल्या भागासाठी त्याला जागतिक ओळख मिळाली. अशातच 'पुष्पा' स्टारला मेणाच्या पुतळ्याने सन्मानित करण्यात आले आहे.

Pushpa 2 Fame Allu Arjun:

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) सध्या चर्चेत आला आहे. अल्लू अर्जुनने यशाची आणखी एक शिडी चढली आहे. अल्लू अर्जुनने नुकताच मादाम तुसाद म्युझियम दुबई येथे त्याच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण केले. 28 मार्च रोजी संध्याकाळी अल्लू अर्जुनच्या पुतळ्याचे अनावरण झाले. अभिनेत्याने मेणाच्या पुतळ्यासोबतचे त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. अल्लू अर्जुनचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अल्लू अर्जुन 'पुष्पा 2: द रुल'साठी सध्या चर्चेत आहे. त्याचवेळी 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाच्या पहिल्या भागासाठी त्याला जागतिक ओळख मिळाली. अशातच 'पुष्पा' स्टारला मेणाच्या पुतळ्याने सन्मानित करण्यात आले आहे. अल्लूने मेणाच्या पुतळ्याच्या अनावरणादरम्यान 'पुष्पा'ची आइकॉनिक पोझ देत फोटो काढले. अल्लू अर्जुनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केलेल्या फोटोमध्ये तो मेणाच्या पुतळ्यासोबत पुष्पाच्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. त्याचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

अल्लू अर्जुनला 'डान्सिंग किंग' म्हणतात. मादाम तुसाद दुबईमध्ये मेणाच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर अभिनेत्याने त्याच्या मेणाच्या पुतळ्यासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. मेणाच्या पुतळ्याला 'आला वैकुंठपूररामुलू' च्या आयकॉनिक लाल जॅकेटमध्ये कपडे घातले आहेत. या पुतळ्याला पुष्पा 'ठगडे ले' हावभाव दाखवते आहेत. अल्लू अर्जुननेही अनावरणासाठी पुतळ्यासारखाच पोशाख परिधान केला होता. अल्लु अर्जुनने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, 'प्रत्येक अभिनेत्यासाठी हा मैलाचा दगड आहे.', असे लिहिले. यावेळी अल्लू अर्जुनचा मेणाच्या पुतळ्यासोबचा फोटो पाहून खरा अल्लू कोण हे ओळखणे देखील कठीण झाले होते.

त्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'Here we go, Madame Tussauds Dubai, thagde le.' अभिनेत्याच्या या फोटोवर त्याचे चाहतेही प्रेमाचा वर्षाव करत असून त्याचे अभिनंदन करत आहेत. त्याचवेळी, मादाम तुसादने मेणाच्या पुतळ्याच्या अनावरणाचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. जो खूपच मजेदार होता. अल्लू अर्जुन जेव्हा मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी तयार होते. तेव्हा त्याचा मुलगी अल्लू अर्हा देखील त्याच्या पुतळ्यासोबत पुष्पा स्टाईलमध्ये पोज देत होता. हे पाहून अभिनेत्याला हासू आवरले नाही.

Allu Arjun Wax Statue
Ranbir Kapoor च्या 'रामायण'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार प्रभू रामाचे भाऊ भरतची भूमिका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com