Upper Lips and Forehead : फोरहेड आणि अप्पर लिप्ससाठी आता पार्लरमध्ये जाण्याची झंझट मिटली; घरीच ट्राय करा 'हा' उपाय

Fashion Beauty Home Remedies : पार्लरप्रमाणे किंवा त्यापेक्षाही छान पद्धतीने घरच्याघरी फोरडेट आणि अप्पर लिप्स कसे करायचे? त्यासाठी कोणते प्रोडक्ट वापरायचे? या सर्वांची माहिती सांगणार आहोत.
Fashion Beauty Home Remedies
Upper Lips and ForeheadSaam TV

अप्पर लिप्स आणि फोरडेटवर सतत छोटे छोटे केस येत असतात. हे केस घालवण्यासाठी महिला पार्लर किंवा स्पामध्ये जातात. काहींना हेअर ग्रोथ जास्त असते. त्यामुळे त्यांना महिन्यातून ३ ते ४ वेळा तरी पार्लरला जावे लागते. सतत येथे जाण्याचा अनेक महिलांना कंटाळा येतो. शिवाय खर्चही वाढतो.

Fashion Beauty Home Remedies
Beauty Tips : सुंदर दिसण्यासाठी स्क्रब करताना या चूका पडतील महागात

त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी पार्लरप्रमाणे किंवा त्यापेक्षाही छान पद्धतीने घरच्याघरी फोरडेट आणि अप्पर लिप्स कसे करायचे? त्यासाठी कोणते प्रोडक्ट वापरायचे? या सर्वांची माहिती सांगणार आहोत.

डाळ आणि बटाटा

बटाट्यामध्ये ब्लिचिंगचे घटक असतात. त्यामुळे केसांची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. त्यासाठी आधी बटाट्याचा बारीक किस करून घ्या. त्यात लिंबाचा रस मिक्स करा. तसेच मसूर डाळा पाण्यात भीजवून मिक्सरला बारीक करून घ्या. या दोन्ही पेस्ट चेहऱ्यावर अप्लाय करा. नंतर २० मिनिटांनी चेहरा धुवून घ्या.

अंडे

सर्वात आधी एक अंडे घ्या. त्यातील सफेद भाग वेगळा करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये १/२ टीस्पून कॉर्नस्टार्च मिक्स करा. तसेच नंतर एक चमचा पिठीसाखर यात मिक्स करा. हे मिश्रण कपाळ आणि ओठांच्यावर केस असतील तेथे अप्लाय करा. सुकल्यानंतर हाताने केसांच्या उलट डायरेक्शनने ते खेचून घ्या.

ओट्स

ओट्सचं जाडं भरडं पिठ तुमच्या घरात असेल तर त्याचा सुद्धा वापर केस काढण्यासाठी करता येईल. त्यासाठी आधी ओट्समध्ये एक पिकलेली केळी कुसकरून मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर अप्लाय करा. त्यानंतर १० मिनिटांनी ही पेस्ट सुकेल तेव्हा केस काढण्यास मदत होईल.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही किंवा दावा सुद्धा करत नाही.

Fashion Beauty Home Remedies
Dark Forehead Home Remedies: चेहरा गोरा पण कपाळावर टॅनिंग जास्त ? जाणून घ्या कारणं व सोपे उपाय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com