Hair dye reaction saam tv
लाईफस्टाईल

Hair dye reaction: केसांना कलर केल्यास होऊ शकते रिएक्शन; अॅलर्जी झाल्यास दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच ओळखा

Hair Colour Allergic Reactions: आजकाल केस रंगवणे (Hair Coloring) खूप सामान्य झाले आहे. पण, अनेकदा यामुळे त्वचेवर ऍलर्जी (Allergy) किंवा गंभीर रिॲक्शन येऊ शकते. हेअर कलरमध्ये असलेल्या रसायनांमुळे, विशेषतः पॅरा-फेनिलिनेडियामाइन (PPD) या रसायनामुळे, ऍलर्जीचा धोका असतो.

Surabhi Jayashree Jagdish

  • हेअर डायमुळे त्वचेवर अॅलर्जी होऊ शकते.

  • PPD हे अॅलर्जीचे मुख्य कारण आहे.

  • खाज, जळजळ आणि सूज ही लक्षणे आहेत.

आजकाल केसांना कलर करणं अनेकांसाठी एक गरजही बनली आहे. पांढरे केस झाकण्यासाठी असो किंवा स्टायलिश लुक मिळवण्यासाठी, हेअर डायचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पण तुम्हाला ठाऊक आहे का, केसांना रंग लावताना अॅलर्जी होण्याचा धोका देखील असतो? कारण बहुतांश हेअर डाईमध्ये असणारे केमिकल्स, विशेषतः पॅरा-फेनिलीन डायमाइन (PPD), काही लोकांच्या त्वचेवर परिणाम करू शकतात. म्हणूनच काही ठराविक लक्षणं दिसू लागली तर ती दुर्लक्ष न करता त्वरित सावध होणं गरजेचं आहे.

हेअर डाईमुळे अॅलर्जी का होते?

हेअर कलरमध्ये असणारे केमिकल्स थेट टाळूवर किंवा त्वचेवर लागल्यावर प्रतिक्रिया करू शकतात. विशेषतः ज्यांची त्वचा संवेदनशील आहे किंवा ज्यांनी पॅच टेस्ट न करता सरळ डाय वापरल्यास त्यांना ही समस्या अधिक जाणवते. सुरुवातीला किरकोळ लक्षणं दिसली तरी ती पुढे गंभीर आजाराचं रूप घेऊ शकतात.

हेअर डायमुळे अॅलर्जीची ५ लक्षणं

खाज आणि जळजळ

डाय लावल्यानंतर काही तासांतच टाळूवर, मानेभोवती किंवा कानाजवळ खाज सुटणे आणि जळजळ होणे हे अॅलर्जीचे पहिले लक्षण असू शकतं. याकडे हलक्यात घेणं धोकादायक ठरू शकतं.

लालसरपणा आणि पुरळ

टाळूवर किंवा केसांच्या मुळाजवळ लाल डाग किंवा छोटे पुरळ उठणं ही देखील अॅलर्जीची सामान्य लक्षणं आहेत. काही वेळा हे पुरळ चेहऱ्यावर आणि मानेवरही पसरतात.

सूज येणं

अॅलर्जी वाढल्यास कपाळ, डोळ्यांच्या आसपास किंवा ओठांवर सूज येऊ शकते. कधी कधी ही सूज इतकी वाढते की डोळे नीट उघडणेही कठीण होऊ शकतं.

डोकेदुखी आणि श्वास घेण्यास त्रास

डाय लावल्यानंतर डोकेदुखी, गरगरणं किंवा श्वास घेण्यात अडचण येणं हे गंभीर एलर्जिक रिऍक्शनचे लक्षण असू शकतं. अशी अवस्था निर्माण झाल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

फोड येणं

गंभीर अॅलर्जीमध्ये टाळूवर किंवा कानाजवळ फोड येऊ शकतात. यामध्ये त्वचा सोलू लागते आणि प्रचंड जळजळ जाणवते. अशी चिन्हे दिसल्यास तातडीने उपचार घेणं आवश्यक आहे.

त्रास होऊ नये म्हणून काय कराल?

  • केस रंगवण्यापूर्वी नेहमी पॅच टेस्ट करा.

  • त्वचा संवेदनशील असल्यास नैसर्गिक घटकांनी बनवलेली किंवा अमोनिया-फ्री डाई वापरा.

  • केसांना रंग देताना हातांना हातमोजे वापरा आणि टाळूवर खोबरेल तेल किंवा पेट्रोलियम जेलीची पातळ थर लावा.

  • जर अॅलर्जीची लक्षणं दिसू लागली तर लगेच केस धुवून डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हेअर डायमुळे अॅलर्जी का होते?

हेअर डायमधील PPD सारख्या केमिकल्स त्वचेवर प्रतिक्रिया निर्माण करतात.

हेअर डाय अॅलर्जीचे सर्वात सामान्य लक्षण कोणते?

टाळूवर खाज सुटणे आणि जळजळ होणे हे सामान्य लक्षण आहे.

अॅलर्जीपासून बचावासाठी काय करावे?

केस रंगवण्यापूर्वी नेहमी पॅच टेस्ट करावी.

संवेदनशील त्वचेसाठी कोणती डाय योग्य आहे?

अमोनिया-मुक्त किंवा नैसर्गिक घटकांची डाय वापरावी.

डाय लावल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत असेल तर काय करावे?

ताबडतोब केस धुवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय मुलाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांकडून रास्ता रोको करत फोडल्या गाड्या

Election Commission: निवडणुकांपूर्वी मतमोजणीच्या नियमात मोठा बदल; EVMच्या आधी पोस्टल बॅलेटची होणार मोजणी

IND vs WI: भारताच्या पाच खेळाडूंची कसोटी कारकीर्द संपुष्टात! विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी संघाच्या घोषणेतून स्पष्ट संकेत

Maharashtra Live News Update: बीडमध्ये उद्धव ठाकरेंचा पाहणी दौरा; शेतकऱ्यांचा संवाद

Beed Rain : बीडला अतिवृष्टीचा तडाखा, तब्बल चार एकर जमीन गेली वाहून| VIDEO

SCROLL FOR NEXT