Guru Purnima Special Dessert Saam TV
लाईफस्टाईल

Guru Purnima Special Dessert : गुरुपौर्णिमेनिमित्त घरच्याघरी बनवा बेसनाचे लाडू; गुरू देखील करतील कौतुक

Guru Purnima Special Besan Ladoo Recipe : भोजन किंवा अन्न हे सर्वात श्रेष्ठ दान असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या गुरूंना सुंदर बेसनाचे लाडू देऊ शकता.

Ruchika Jadhav

आज सर्वत्र गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. रविवार असल्याने अनेकांना आज सुट्टी आहे. आता प्रत्येकवेळी गुरुंसाठी तुम्ही काही ना काही गिफ्ट घेत असाल. तर यावेळी तुम्ही काही तरी वेगळं ट्राय करू शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या गुरूंना स्वतः बनवलेला एखादा पदार्थ देऊ शकता.

त्यामुळे आज गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही तुमच्यासाठी बेसन लाडूची रेसिपी आणली आहे. ही रेसिपी अतिशय सोप्पी आहे. तसेच यासाठी फार कमी साहित्य लागते. भोजन किंवा अन्न हे सर्वात श्रेष्ठ दान असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या गुरूंना सुंदर लाडू देऊ शकता.

साहित्य

बेसन पीठ 4 वाटी

साखर 2 वाटी

1 वाटी रवा

ड्रायफ्रूट्स

दूध

तूप

कृती

सुरुवातीला गॅसवर एका कढई ठेवा. यामध्ये थोडं तूप घ्या आणि आधी सर्व ड्रायफ्रूट्स छान भाजून घ्या. त्यानंतर कढईत आणखी थोडं तूप घ्या. त्यात बेसन पीठ भाजण्यासाठी सुरुवात करा. बेसन पीठ भाजत असताना गॅस फास्ट ठेवू नका. त्याने पीठ लगेच जाळून जाते आणि करपट चव लागते.

बेसन पीठ भाजत असताना गॅस मिडीअम टू लो फ्लेवर ठेवा. त्यामध्ये बेसन पीठ सतत चमच्याने भाजत रहा. थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी हे पीठ खराब होते. पीठ थोडे गोल्डन ब्राऊन झाले की त्यामध्ये एक वाटी दूध मिक्स करा. दूध टाकल्याबरोबर लगेचच चमच्याने ते पिठात एकजीव करून घ्या.

पीठ भाजून झाल्यावर ते एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्या. त्यानंतर कढईत आणखी थोडे तूप घ्या आणि रवा भाजून घ्या. रवा भाण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. रवा पटपट भाजून घ्या. त्यानंतर ज्या प्लेटमध्ये तुम्ही बेसन पीठ ठेवले आहे त्यामध्येच हे बेसन पीठ सुद्धा ठेवा.

त्यानंतर हे सर्व मिश्रण थंड होऊ द्या. पुढे थंड झाल्यावर बेसन पीठ आणि रवा हाताच्या साहाय्याने एकजीव करून घ्या. त्यानंतर यामध्ये साखर मिक्स करा. साखर देखील यात छान मिक्स करून घ्या. त्यानंतर यावर ड्रायफ्रूट्स टाकून घ्या. पुढे या सर्वाचे छान लाडू वळून घ्या. लाडूला मस्त आकार द्या आणि त्यावर झाला तुमचा गोड, लुसलुशीत बेसन लाडू.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT