Ruchika Jadhav
यंदा गुरुपौर्णिमा उद्या म्हणजेच रविवारी २१ जुलै रोजी साजरी केली जात आहे.
गुरुपौर्णिमेला तुम्ही देखील तुमच्या गुरुंचे दर्शन घेत असाल, त्यावेळी त्यांना गिफ्ट देखील दिले पाहिजे.
गुरुंना गिफ्ट दिल्याने तसेच त्यांची पुजा केल्याने ते आपल्याला आशिर्वाद देतात. त्याने आपली आणखी प्रगती सुद्धा होते.
तुम्ही गुरुंसाठी गिफ्ट शोधत असाल तर त्यांना त्यांनी कधीही न वाचलेलं एखादं सुंदर पुस्तक गिफ्ट करा.
तुम्ही तुमच्या गुरुंना पेन गिफ्ट केला तर तो चिरकाळ त्यांना उपयोगी पडेल आणि स्मरणात राहिल.
आपल्या आयुष्यात गुरुस्थानी अनेक व्यक्ती असतात. त्यात सर्वाच जवळच्या व्यक्तीसाठी तुम्ही चांदीचा कॉइन सुद्धा गिफ्ट करू शकता.
भारतातील मसाल्यांसह येथील मिठाई प्रत्येकाच्या आवडीची असते. त्यामुळे तुम्ही गुरुंसाठी स्वत: अशी मिठाई तयार करून देऊ शकता.
फुलं हे सुद्धा एक सुंदर गिफ्ट आहे, फुलं दिल्याने मन प्रसन्न होते.