Ruchika Jadhav
पावसाळा हा प्रत्येकाचा आवडता ऋतू आहे. याच ऋतूमध्ये विविध धान्य पिकवली जातात.
पावसाळा सुरू होताच आपल्याला विविध चमचमीत पदार्थ खावे वाटतात. चाखावे वाटतात.
मात्र पावसाळ्यात चुकूनही बाहेरचे फास्टफूड खाऊ नये. त्याने पोट बिघडते.
पालेभाज्या सुद्धा पावसाळ्यात खाणे टाळावे. कारण या काळात यात जास्त माती आणि किटक असण्याची शक्यता आसते.
तुम्ही पावसाळ्यात सलॅड सुद्धा खाऊ नये. यात आपण कच्च्या भाज्या खातो हे आरोग्यासाठी पावसाळ्यात घातक आहे.
पावसाळ्यात पाण्यामुळे सर्दी, खोकला असे आजार होतात. त्यामुळे लोणचं खाल्ल्याने या समस्या आणखी वाढण्याची शक्यता असते.