Vegetables for Diabetes SAAM TV
लाईफस्टाईल

Vegetables for Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांसाठी 'या' भाज्या वरदान! शुगर राहील नियंत्रणात

Green Leafy Vegetables Beneficial For Diabetes : आपल्या आहाराचा आरोग्यावर परिणाम होत असतो. पोषक तत्वांच्या अभावामुळे मधुमेहाचे प्रमाण आजकाल वाढत आहे. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आजपासून पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.

Shreya Maskar

दिवसेंदिवस मधुमेहाचे रुग्ण वाढत चाले आहेत. बदलत्या जीवनशैली तसेच आहारामुळे शरीरातील साखरेच्या पातळीवर परिणाम होताना दिसत आहे. मधुमेहावर मात करण्यासाठी आहारात फायबर, कार्बोहाइड्रेट, प्रथिने असणे खूप महत्वाचे आहे. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्यास मधुमेह नियंत्रणात राहू शकतो.

कोबी

कोबीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. जे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. कोबीमधील फायबरमुळे रक्त प्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना आराम मिळतो. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत करते. कोबीचे सॅलड व कमी मीठ घातलेली कोबीची भाजी तु्म्ही खाऊ शकता.

फ्लॉवर

फ्लॉवर भाजी रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास प्रतिबंध करते. फ्लॉवरच्या भाजीमुळे आपले चयापचय सुरळीत होते. कारण मधुमेहीच्या रुग्णांना अन्न पचायला जास्त वेळ लागतो.

पालक

हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक ही बहुगुणी आहे. पालकमध्ये स्टार्च नसल्यामुळे डॉक्टर सुद्धा मधुमेहाच्या रुग्णांना पालक भाजी खाण्याचा सल्ला देतात. पालक मधील फायबर आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म शरीरातील साखरेची पातळी रोखण्यास मदत करतात. पालक मधील आयर्न आणि लोह रक्त शुद्ध करून रक्तप्रवाह सुरळीत करतो. पालक मध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.

काकडी

मधुमेहाच्या रुग्णांनी रोज जेवताना सॅलडमध्ये काकडी खावी. काकडी ही पोटाला थंडावा देते आणि शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी मदत करते.तसेच काकडी खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. शरीरात उत्तम पाण्याची पातळी ठेवल्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना फायदा होतो.

दोडका

दोडक्यामधील पोषक घटक हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवते. जे मधुमेहाच्या रुग्णांना गरजेचे आहे. नियमित दोडका भाजीचे सेवन केल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रणात राहते. तसेच दोडका पचन सुरळीत करते. दोडका मॅग्नेशियमयुक्त असल्यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो. तसेच टाईप 2 मधुमेहासाठी दोडका रामबाण उपाय आहे.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT