Kitchen Hacks SAAM TV
लाईफस्टाईल

Kitchen Hacks : पावसाळ्यात 'हिरवी मिरची' खराब होण्याचं टेन्शन विसरा अन् करा 'हा' खास उपाय, दीर्घकाळ राहील टवटवीत

Tips For Store Green Chillies : पावसाळ्यात दमट हवामानामुळे भाज्या आणि फळांची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण ते लवकर खराब होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे हिरवी मिरची पावसाळ्यात लवकर खराब होऊ नये म्हणून 'हे' उपाय करा.

Shreya Maskar

हिरवी मिरची शिवाय अन्नाला चव येत नाही. झणझणीत पदार्थांसाठी मिरची महत्त्वाची असते. मात्र ही चव वाढवणारी मिरची पावसाळ्यात दीर्घकाळ टिकत नाही. लवकर सडते. त्यामुळे पैसे देखील वाया जातात.

हिरवी मिरची स्टोअर कशी करावी?

  • पावसाळ्यात हिरवी मिरची स्टोर करताना विशेष काळजी घ्यावी. कारण हवामान दमट असते. यामुळे मिरच्या लवकर खराब होतात.

  • पावसाळ्यात हिरवी मिरची स्टोर करताना त्यांचे देट काढून घ्यावेत.

  • देट काढलेली हिरवी मिरची स्टोर करण्यापूर्वी हळदीच्या कोमट पाण्यात काही वेळ भिजवून ठेवा.

  • भिजवलेली हिरवी मिरची कपड्यांने पूर्ण कोरडी करून घ्या. मगच स्टोर करा.

  • हिरवी मिरची स्टोर करताना त्यामध्ये पाणी राहणार नाही याची काळजी घ्यावी.

हिरवी मिरची फ्रिजमध्ये कशी स्टोअर करावी?

  • हिरवी मिरची तुम्ही फ्रिजमध्ये स्टोअर करू शकता.

  • हिरवी मिरची फ्रिजमध्ये स्टोअर करताना झिपलॉक बॅग किंवा हवाबंद डब्याचा वापर करावा.

  • झिपलॉक बॅग किंवा हवाबंद डब्यामध्ये मिरची स्टोअर करताना त्यामध्ये लसूणच्या काही पाकळ्या टाकाव्यात. यामुळे मिरची लवकर खराब होणार नाही.

  • लसूण मिरच्या लवकर सडणार नाही याची काळजी घेते.

  • लसूणमुळे बॅक्टेरियाची वाढ थांबते.

  • हव्याबंद डब्यामध्ये मिरची स्टोअर करताना त्यात टिश्यू पेपर ठेवायला विसरू नका. हा टिश्यू पेपर तुम्ही दर दोन दिवसांनी बदला.

पावसाळ्यात 'या' गोष्टी लक्षात ठेवा

  • पावसाळ्यात जास्त प्रमाणात मिरची खरेदी करून ठेवू नये.

  • तसेच पावसाळ्यात मिरची खरेदी करताना त्याचा दर्जा पाहावा.

  • बाजारातून घेऊन आलेली मिरची स्वच्छ करून खराब झालेल्या मिरच्या काढून टाका.

हिरवी मिरची स्टोअर करण्याचे उपाय

  • हिरवी मिरची स्टोअर करण्याआधी त्यांना तेल कुकिंग ऑईल लावा. यामुळे मिरच्या लवकर खराब होत नाहीत.

  • दीर्घकाळ मिरची ताजी राहावी यासाठी तुम्ही एका भांड्यात लिंबू आणि मीठ मिक्स करून त्यात मिरच्या घोळवून घ्या आणि डब्यामध्ये स्टोअर करा.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' ब्लड ग्रुपच्या व्यक्ती असतात सर्वात हुशार, प्रत्येक कामात मिळतं यश

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

SCROLL FOR NEXT