Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Create Confusion By Independent Candidate In Magathane: अपक्ष उमेदवार राकेश उर्फ उदेश शांताराम पाटेकर यांनी छापलेली पत्रके काही मुले मतदारसंघात वाटत होती. ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
Create Confusion By Independent Candidate In Magathane
Maharashtra Politics Saam Tv
Published On

संजय गडदे, मुंबई

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा हा शेवटचा दिवस आहे. मुंबईच्या मागाठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदेश शांताराम पाटेकर या उमेदवाराच्या नावाशी नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराकडून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी पत्रक वाटण्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस तपास करत आहेत.

अपक्ष उमेदवार राकेश उर्फ उदेश शांताराम पाटेकर यांनी छापलेली पत्रके काही मुले मतदारसंघात वाटत होती. या पत्रकामध्ये राकेश हे नाव अगदी लहान ठेवून उदेश शांताराम पाटेकर हे नाव मात्र ठळक अक्षरात लिहून मी शिवसेना उमेदवार प्रकाश सुर्वे यांना पाठिंबा देत असल्याचं म्हटले आहे. मात्र हा प्रकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार उदेश पाटेकर यांच्या लक्षात येताच पत्रके वाटणाऱ्या मुलांना त्यांनी ताब्यात घेऊन दहिसर पोलिस ठाण्यामध्ये आणले आहे.

Create Confusion By Independent Candidate In Magathane
Sharad Pawar vs Ajit Pawar : साहेब की दादा, बारामतीमध्ये आज कुणाचा आव्वाज घुमणार?

दहिसर पोलिस ठाण्यात ठाकरे गटाचे उमेदवार उदेश पाटेकर यांच्यासोबतच ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील जमा झाले आहेत. मात्र ज्या उमेदवाराने ही पत्रके वाटली आहेत त्याचं नाव राकेश पाटेकरच आहे. मात्र त्याने मुद्दामून राकेश उर्फ उदेश शांताराम पाटेकर असं नाव वापरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे असं शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराचे मत आहे. सध्या याप्रकरणी तपास सुरू आहे.

Create Confusion By Independent Candidate In Magathane
Pune Crime: आधी अपहरण, नंतर निर्घृण हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; बांधकाम व्यवसायिकाच्या हत्येने पुणे हादरले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com