सध्या पावसाळा सुरू आहे. मुसळधार पावसात सर्वत्र हिरवळ बहरते. अशात रानात आपण खाऊ शकतो अशा अनेक भाज्या देखील येतात. त्यातीलच एक करटूलीची रानभाजी. ही भाजी चवीला फारच चविष्ट आहे. यामध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन असतात. शिवाय ही भाजी फक्त पावसाळ्याच्या सीझनमध्ये असते. त्यामुळे तुम्ही पावसाळ्यात ही भाजी नक्की खाल्ली पाहिजे.
करटूली काही प्रमाणात कडू सुद्धा असतात. त्यामुळे ही भाजी काही व्यक्ती खात नाहीत. मात्र सर्वच करटूली कडू नसतात. त्यामुळे तुम्हाला योग्य भाजी निवडता येणे गरजेचे आहे. आता करटूलीची योग्य निवड कशी करायची याची माहिती जाणून घेऊ.
योग्य करटूली निवडताना आधी करटूलीचा रंग पाहा. जास्त हिरवी करटूली चवीला कडू असते. त्यामुळे पोपटी आणि फ्रेश असलेली करटूली भाजीसाठी निवडा. अशी करटूली अजिबात कडू लागत नाहीत.
साहित्य
करटूली
कांदा
जिरे
तेल
कडीपत्ता
लसूण
टोमॅटो
हिरव्या मिरच्या
हळद
मीठ
लिंबू
कृती
सर्वात आधी करटूलीचे बारीक दोन भाग करून घ्या. त्यानंतर यामध्ये असलेला बियांचा भाग काढून घ्या. पुढे करटूली एका भांड्यात घ्या आणि त्यावर थोडं मीठ, हळद आणि लिंबू लावून घ्या. 10 मिनिटे हे मिश्रण असेच ठेवा.
त्यानंतर सर्व करटूली त्याच भांड्यामध्ये थोडे रगडून त्यातील पाणी गाळून घ्या. तसेच एका स्वच्छ पाण्याने ते धुवून घ्या. असे केल्याने करटूलीमधील थोडाफार कडवटपणा असेल तर तो निघून जातो.
आता पुढे गॅसवर एक कढई ठेवा. कढईमध्ये तेल घ्या. तेल छान तापलं की आधी थोडे जिरे टाका, नंतर लगेच कढीपत्ता आणि मग चिरलेला कांदा टाका. कांदा छान परतून घ्या. त्यानंतर यामध्ये टोमॅटो मिक्स करा.
या फोडणीमध्ये त्यांच्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या, हळद आणि मीठ टाकून घ्या. सर्व मिश्रण छान एकजीव करून यामध्ये करटूली मीस्क करा. करटूली चांगली शिजली की त्यावर कोथिंबीर बारीक चिरून टाकून द्या. तयार झाली तुमची चमचमीत करटूलीची भाजी.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.