Thick Malai At Home : दुधावर घट्ट साय येत नाही? 'या' ट्रिकने झटक्यात येईल जाडसर मलाईचा थर

Kitchen Hacks : दुधावर घट्ट साय का येत नाही? या प्रश्नाने बरेच लोक त्रस्त असतात. मात्र आता 'या' सोप्या ट्रिकने तुम्ही काही मिनिटांत दुधावर जाडसर मलाईचा थर आणू शकता.
Kitchen Hacks
Thick Malai At HomeSAAM TV
Published On

दुधावरची साय अनेकांना आवडते. पण हल्लीच्या दुधावर ही साय पाहायला मिळत नाही. यामुळे दुधाची साय नीट वापरता येत नाही. दुधाची साय आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्वचेसोबत केसांचे आरोग्यही ते चांगले ठेवते. दुधावर साय येण्यासाठी अनेक घटक महत्त्वाचे असतात. जसे की, दुधाचा दर्जा, दूध उकळण्याची पद्धत

'या' गोष्टी लक्षात ठेवा

ताजे दूध

ताज्या दुधामध्येच छान मलई येते. दूध उकळल्यावर जास्त फॅटफूल होऊन जेव्हा ते थंड होते तेव्हा त्यावर छान मलई येते.

फुल क्रीम दूध

तुम्हाला झटपट दुधावर घट्ट साय हवी असल्यास बाजारातील फुल क्रीम दूध त्यात मिसळा आणि उकळवा. यामुळे काही मिनिटांत दुधावर घट्ट साय येईल.

दुधाची गुणवत्ता

दुधावर किती साय येणार हे दुधाच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.

Kitchen Hacks
Bhringraj For Hair: 'ही' औषधी वनस्पती तुमच्याकडे आहे का? काळेभोर आणि घनदाट केसांसाठी वरदान

मंद आचेवर दूध उकळवा

दुधावर घट्ट साय येण्यासाठी दूध थंड झाल्यावर मंद आचेवर उकळून घ्या आणि फ्रिजमध्ये ठेवून द्या. काही वेळा नंतर दूधावर जाड साय पाहायला मिळेल. दूध कधीही मंद आचेवर उकळावे. कारण दुधाची साय तुम्ही दूध कसे उकळवता यावर अवलंबून असते.दूध थंड करण्यासाठी जाळीच्या झाकणाचा वापर करा. यामुळे लवकर दूध लवकर रूम टेंपरेचरवर येते.

महत्त्वाची टिप

दुधावरची साय स्टोर करताना नेहमी हवाबंद डब्यामध्ये ठेवा. फ्रिजमध्ये अशीच उघडी ठेवल्यास त्यावर बुरशी येऊ शकते.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे.

Kitchen Hacks
Skin Care Tips : फुलांमध्ये दडलयं ब्युटी सीक्रेट, घरबसल्या चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com