Shraddha Thik
दुधाची साय खाल्ल्याने वजन वाढते, असा अनेकांचा समज असतो. परंतु रोज एक किंवा दोन चमचे साय खाल्ल्यास वजन नियंत्रणात राहते.
तसेच नियमित योग्य प्रमाणात साय खाल्ल्यास आरोग्यसंबंधी अनेक फायदे होतात.
सायीमध्ये सॅच्युरेटेड फॅट असतात. यामुळे कोलेस्टेरॉल कमी होतात आणि हार्ट अटॅकपासून बचाव होतो.
यामध्ये शॉर्ट चेन फॅटी अॅसिड असतात. यामुळे डायजेशन चांगले होते.
यामध्ये व्हिटॅमिन के 2 असते. यामुळे मसल्स मजबूत होतात. संधीवाताचा त्रास होत नाही.
सायीमध्ये पोटॅशियम असते. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
सायमध्ये फॅटी अॅसिड असतात, जे शरीरातील फॅट बर्न करतात. यामुळे वजन कमी होते.