Bhringraj For Hair: 'ही' औषधी वनस्पती तुमच्याकडे आहे का? काळेभोर आणि घनदाट केसांसाठी वरदान

Benefits of Bhringraj for Hairs: पूर्वीच्या काळात सर्वच महिलांचे केस अगदी गुडग्यापर्यंत लांबसडक असालयचे. मात्र आता अगदी तरुण वयातच मुलींसह मुलांना केस पांढरे होण्याच्या समस्या होत आहेत.
Benefits Of Bhringraj
Bhringraj For HairSaam TV
Published On

भरतात विविध प्रकारच्या औषधी वनस्पाती मिळतात. येथील निसर्गाकडून मिळणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या आरोग्यासाठी फार लाभदायी आहेत. निसर्गाकडून मिळालेल्या वनस्पती आपल्या केसांसह त्वचेसाठी सुद्धा महत्वाच्या असतात. पूर्वीच्या काळात सर्वच महिलांचे केस अगदी गुडग्यापर्यंत लांबसडक असायचे. मात्र आता अगदी तरुण वयातच मुलींसह मुलांना सुद्धा केसांच्या समस्या होत आहेत.

Benefits Of Bhringraj
Onion Juice For Hair: केस गळतीवर रामबाण काद्यांचा रस; असा करा वापर

जग बदलत असताना पूर्वीच्या नॅचरल प्रोडक्टची जागा आता केमिकल्स युक्त प्रोडक्टने घेतली आहे. यामुळे केसांना पोषक तत्व मिळत नाहीत. परिणामी मुलींचे केस पातळ आणि विरळ होत चालले आहेत. तसेच केसांमध्ये मजबुती सुद्धा राहिलेली नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्ही औषधी वनस्पातींमध्ये राज्याच्या दर्जावर असलेल्या भृंगराज वनस्पती बाबात सांगणार आहोत. ही वनस्पती आपल्या केसांसाठी फार फायदेशीर आहे.

केसांसाठी भृंगराज महत्वाचे का आहे?

भृंगराज अशी वनस्पाती आहे जी केसांसाठी फारच उपयुक्त आहे. या वनस्पतीने अगदी टक्कल असलेल्या व्यक्तीला सुद्धा लांबसडक केस येऊ शकतात, असं नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनकडून देखील सांगण्यात आलं आहे. भृंगराज वनस्पती हेअर ग्रोथ सायकल अॅक्टीव करण्यासाठी काम करते. त्यामुळे तुम्ही सुद्धा केसांच्या अशा समस्यांपासून कंटाळले असाल तर भृंगराज वनस्पतीचा वापर करू शकता.

केसांसाठी भृंगराज तेलाचे फायदे

भृंगराज वनस्पती केसांची मुळे मजबूत करते. तसेच हेअर फॉल कमी करण्यास जास्तीत जास्त मदत करते.

तुम्ही दररोज भृंगराज वनस्पतीचा वापर केला तर कमी वयात पांढरे झालेले केस पुन्हा काळे होण्यास मदतत होते. तसेच केसांना डाय न लावता नॅचरल काळा रंग येतो.

ज्यांचे केस जास्त ड्राय असतात त्यांच्यासाठी सुद्धा भृंगराज फायद्याचे आहे. त्याने केस अतिशय सुळसुळीत आणि मऊ होतात.

भृंगराजमधील पोषक तत्व केसांत कोंडा होऊ देत नाहीत. ज्यांच्या केसांत कोंडा असेल तो देखील काही दिवसांत दूर होतो.

कसे वापरायचे?

भृंगराज ही एक वनस्पती आहे. बाजारात ही वनस्पती पानं आणि फुल, तेल, पावडर अशा स्वरुपात उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार याचा वापर करू शकता.

तुमच्याकडे या वनस्पतीचे तेल असेल तर हेअर वॉश करण्याआधी २ तास तेल केसांना अप्लाय करा. नंतर पावडरच्या मदतीने हेअर वॉश करून घ्या.

Benefits Of Bhringraj
Monsoon Hair Care : पावसाळ्यात केस गळतीपासून सुटका हवीय? 'हे' आंबट पदार्थ खाऊन पाहा, टक्कल होईल गायब

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com