Govardhan Puja 2026 saam tv
लाईफस्टाईल

Govardhan Puja 2026 : सोमवार की मंगळवार, गोवर्धन पूजा कोणत्या दिवशी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Diwali 2026 : गोवर्धन पूजा २०२६ नेमकी ९ की १० नोव्हेंबरला आहे? जाणून घ्या योग्य तारीख आणि भगवान श्रीकृष्णाशी संबंधित पौराणिक कथा.

Sakshi Sunil Jadhav

दिवाळीचा उत्साह सुरू असतानाच आता गोवर्धन पूजेची तयारीही सुरू झाली. दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवात गोवर्धन पूजा हा महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते. घराच्या अंगणात शेणापासून गोवर्धन पर्वताची प्रतिकृती तयार करून तिची पूजा करण्याची परंपरा आहे. मात्र यंदा प्रतिपदा तिथी दोन दिवस असल्याने गोवर्धन पूजा नेमकी ९ की १० नोव्हेंबरला करायची, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया गोवर्धन पूजेची योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत.

गोवर्धन पूजा २०२६ कधी आहे?

हिंदू पंचांगानुसार, दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला गोवर्धन पूजा साजरी करायची असते. यंदा प्रतिपदा तिथीची सुरुवात ९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजून ३१ मिनिटांनी होईल. तर या तिथीची समाप्ती १० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता होईल. उदया तिथीच्या नियमानुसार, यंदा १० नोव्हेंबर २०२६ रोजी गोवर्धन पूजा साजरी केली जाईल.

गोवर्धन पूजेचा शुभ मुहूर्त

गोवर्धन पूजेच्या दिवशी योग्य मुहूर्तावर पूजा केल्याला विशेष महत्त्व आहे. यंदाचे शुभ मुहूर्त पुढीलप्रमाणे आहेत.

गोवर्धन पूजा प्रातःकाल मुहूर्त - सकाळी ६:४० ते ८:५०

ब्रह्म मुहूर्त - सकाळी ५:०० ते ५:५१

विजय मुहूर्त - दुपारी २:०६ ते २:५०

गोधूळ मुहूर्त - संध्याकाळी ५:५७ ते ६:१३

निशिता मुहूर्त - रात्री ११:४९ ते १२:४१

गोवर्धन पूजेचे साहित्य

गोवर्धन पूजेसाठी गायीचे शेण, फुले, हार, नारळ, मिठाई, फळे, खीर, दूध, दही, मध, बताशे, तांदूळ, दिवा, गंगाजल, कलश, रोळी आणि तूप या वस्तूंची आवश्यकता असते.

गोवर्धन पूजा कशी करावी?

गोवर्धन पूजेच्या दिवशी सकाळी घरातील अंगण स्वच्छ करून घ्या. त्यानंतर गायीच्या शेणापासून गोवर्धन पर्वताची प्रतिकृती तयार करा. या प्रतिकृतीला फुले आणि हारांनी सजवा. यानंतर रोळी, अक्षता, फुले, पाणी, धूप आणि दिवा लावून गोवर्धन महाराजांची विधीनुसार पूजा करावी. गोवर्धन पर्वताची सात वेळा प्रदक्षिणा घालून आरती करा. भगवान श्रीकृष्णाला ५६ प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य म्हणजेच छप्पन भोग अर्पण करण्याची परंपरा आहे.

गोवर्धन पूजा हा फक्त धार्मिक उत्सव नसून निसर्ग, पर्यावरण, पशुधन आणि माणूस यांच्यातील नात्याची जाणीव करून देणारा सण आहे. त्यामुळे या दिवशी गोवर्धन पर्वतासह गायीची पूजा करण्याला विशेष महत्त्व दिले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Muhurat Trading: दिवाळीत मोठा धमाका! शेअर बाजारात जोरदार तेजी, मुहूर्त ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स- निप्टीमध्ये मोठी वाढ

Kurti for Short Height Girl: कमी हाइटच्या मुलींवर खुलून दिसतील कुर्त्याच्या 'या' डिझाइन्स, दिसाल अधिक उंच आणि सुंदर!

Maharashtra News Live Update: पंढरपूरात ऊस दराच्या मागणीसाठी राजू शेट्टी यांचा एल्गार

हात-पायांना मुंग्या का येतात? यामागचं कारण काय?

Mumbai : मुंबईत कचरा टाकणाऱ्यांवर आता AI कॅमेऱ्यांची नजर! नियम मोडल्यास भरावा लागणार दंड

SCROLL FOR NEXT